<
भडगांव (प्रतिनिधी) : महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन भडगांवच्या वतीने सवित्रीचे वाण एक अनोखा उपक्रम महिलांसाठी राबविण्यात आला. संक्रांतीनिमित्त हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुवासिनी महिलांसाठी होत असतात. परंतु विधवा परित्यक्ता महिलांना सदर कार्यक्रमात बोलावले जात नाही अशा अंधश्रद्धा निर्मूलनाचा भाग म्हणून एक नाविन्यपूर्ण उपक्रम सावित्रीचे वाण या उद्देशाने कोरोना काळात दुर्दैवाने पती वारले अशा महिलांसाठी व समाजात ज्या महिलांचा सन्मान होत नाही अशा मजुरी करणाऱ्या, मजूर राबविणाऱ्या, मार्गदर्शन करून रोजगार उपलब्ध करून महिलांचा सन्मानासाठी सावित्री वाण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित सुवासिनी, विधवा, परित्यक्त्या महिलांनी परिचय करून आपल्या संघर्षमय जीवनातील अनुभव कथन केले. प्रास्ताविक मार्गदर्शन महिला दक्षता समिती अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, सूत्रसंचासलन माहिती उपाध्यक्ष मिना बाग, व्यवस्था सहकार्य समिती सदस्या अनुक्रमे रेखा पाटील, नूतन पाटील, लता पाटील, साजिदा शेख, माई बोरसे सह पोलिसलाईन महिला प्रतिनिधी, अस्मिता चव्हाण, कविता महाजन, दिपाली अहिरे, मनीषा हाडपे, दुर्गा पवार, उषा सोनवणे, वैशाली गायकवाड़, अरुणा सोनवणे आदि महिला सदस्यांनी केले. महिलांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या शेतात उपयोगी सनकोट शाल व उपयोगी भेटवस्तु, विधवा महिलांना साडी व गिफ्ट, सुवासिनी महिलांना गिप्ट, तिळगुळ वाटप करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व जीवनात संघर्ष करण्यासाठी एक नवी उमेद घेऊन आलेल्या प्रत्येक संकटावर आपण महिला एकमेकांना साथ देऊन मार्गक्रमण करूया व आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया असा संकल्प केला. यशस्वीतेसाठी पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, पो.कॉ. स्वप्निल पाटील, हवालदार विलास पाटील, सर्व अधिकारी कर्मचारी सह महिला दक्षता समितीचे मार्गदर्शन लाभले.