<
मुंबई,(प्रतिनिधी)- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवास्थाना बाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज पोलिसांनी लाठीमार केल्याने सर्वच स्तरावून नाराजी व्यक्त होतं असतांना महाराष्ट्र स्टुडंट युनियन (मासू) संघटनेने ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून तीव्र निषेध नोंदवला आहे.विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा धिक्कार असो! मुंबई पोलीस व शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांचा जाहीर निषेध! अशा शब्दात संघटनेने निषेध नोंदवीला आहे.
नेमक काय होत प्रकरण….
परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक होतं ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध करत ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली, दरम्यान यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे.
लाठी चार्ज करणार्या पोलिसांवर कारवाईची मागणी…
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? याबाबत चौकशी होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांवर लाठी चालवीणाऱ्या पोलिसांचे निलंबन करावे अशी मागणी करत आंदोलन करणारे विद्यार्थी होते गुन्हेगार नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.