<
जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी दिल्ली NECRT भवन येथे आयोजित बेस्ट अचीवर अवॉर्ड 2021 मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला होता , महिलांच्या सबलीकरणासाठी महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/जंजाळे यां महिलांना स्व-संरक्षणाचे धडे देतात स्वयंसिद्धाच्या माध्यमातून यांनी गेल्या १५ वर्षांपासून सतत निस्वार्थ कार्य केले आहे. महिला सबलीकरण असो वा आदिवासी आश्रमशाळांमधील मुलींचे सबलीकरण असो या सबलीकरणाचा कुठलाही मोबदला किंवा मानधन न घेता असे प्रशिक्षण त्या आयोजीत करत असतात किंवा शासनाने अथवा विविध संस्थांनी आयोजित केलेले कार्यक्रम किंवा गोरगरीब व गरजू मूला मुलींना कराटे चे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी अश्विनी प्रताप निकम या नेहमी आपली तयारी दाखवत असतात.
महाराष्ट्रातून महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी प्रताप निकम यांची निवड झाली होती, परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे कार्यक्रमांना बंदी करण्यात आली त्यामुळे मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या शासन मान्य संस्थेने हा पुरस्कार पोस्टा मार्फत पाठवून आपल्याच शहरातील मान्यवरांच्या हस्ते आपण पुरस्कार स्वीकार करा असे सुचविले अश्विनी प्रताप निकम/जंजाळे महिला पोलीस कराटे प्रशिक्षक यांनी हा पुरस्कार आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी साहेब ,सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा साहेब आदींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्काराचा स्वीकार आश्विनी प्रताप निकम/जंजाळे यांनी आपल्या पोलिस खात्यातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार घेऊन आपल्या प्रशासनाचा अभिमान बाळगत पोलीस खात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी अश्विनी निकम यांचे अभिनंदन करून पोलीस खात्याचे नाव आपल्या सारखच पोलीस कर्मचाऱ्यामुळे उंचावते व आपण असेच निस्वार्थ कार्य करत राहावे असे मार्गदर्शन केले त्याबद्दल उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अश्विनी निकम/जंजाळे यांनी ऋण व्यक्त केले तसेच मानव संसाधन केंद्र जळगाव चे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, ए.एस.आय. गायकवाड, पप्पू देसले सर यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत असते अमित माळी सर यांच्या मार्गदर्शनात द्वारे मला विविध कार्यक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते असे देखील वक्तव्य निकम यांनी केले.