Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपचार

जळगाव दि.१ – विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्‍या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्‍या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्‍या, कुणाशीही न बोलणार्‍या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्‍याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला. कडक ऊन असो वा पाऊस असो वा सद्यस्थीतीला पडणारी कडाक्याची थंडी, या सर्वांमध्ये तो एका कोपर्‍यात बसून राही. कधीतरी सिगारेटचा झुरकाही तो मारत असे. स्वभावाने अत्यंत हळवे असणार्‍या डॉ.उल्हास पाटील यांच्या मनात त्या तरुणाविषयी आस्था निर्माण झाली.
एके दिवशी रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांशी त्यांनी या तरूणाच्या अवस्थेबाबत चर्चा केली. मग काय हा तरूण मानसोपचार विभागाकरीता आव्हान ठरला असून त्याच्यावर उपचार करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली. याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून तरूणावर आपण उपचार करू शकतो का? होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तरूण उपचारास तयार होईल का? किंवा पळून जाईल का? या अनेक शक्यता पडताळून पाहत आज प्रवेशद्वारा बाहेेर जावून त्या तरूणाला उपचारासाठी तयार करण्यात मानसोपचार तज्ञांनी यश मिळवले आहे.
दरम्यानच्या काळात ना आंघोळ ना दाढी, डोईवरचे केस वाढलेले, अंगात मळकट कपडे असलेल्या या तरूणाची सर्वप्रथम दाढी, कटिंग करण्यात आली. या नंतर स्वच्छ कपडे देण्यात आले. वार्डात नेवून त्याची आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले आहे. या तरूणावर उपचार देखिल सुरु झाले असून सकारात्मक प्रतिसाद देखिल मिळत आहे.
वाट चुकलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणणार – माजी खा. डॉ उल्हास पाटील
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. व्यसनामूळे वाट चुकलेल्या देशाचे भवितव्य असलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मानसोपचार विभाग करणार असून जास्तीत जास्त तरूणांनी उपचार करून घ्यावे असे आवाहन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत बौद्धीत संपदा हक्‍कावर संवाद

Next Post

चाळीसगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड

Next Post
चाळीसगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड

चाळीसगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo