<
जळगाव – अथक परिश्रमाने दिल्ली गाठत आर्मीच्या निगराणीखाली प्रशिक्षण घेत नुकत्याच झालेल्या २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या परेडीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून, महाराष्ट्रातून एक नंबर ठरलेली मोक्षदा ही आज तमाम मुलींसाठी रोल मॉडेल ठरली असून या दैदिप्यमान यशप्राप्तीसाठी मोक्षदाचे अभिनंदन करतांना आज अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.
जळगाव येथील मोक्षदा चौधरी हिची १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत निवड होऊन तिने नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उत्कृष्ट सादरीकरण केले. राष्ट्रीय पातळीवरच्या सोहळ्यातील सहभागाबद्दल शुक्रवार, ४ रोजी ज्ञानदेव नगरातील निवासस्थानी तिचा कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम ढोल-ताशांच्या गजरात तिची मिरवूणक काढण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची विशेष उपस्थीती होती. पुढे बोलतांना डॉ.पाटील म्हणाले की, मोक्षदा ही लहानपणापासून अंत्यंत हुशार गुणी मुलगी आहे. यंदाच्या परेडमध्ये तिने सहभाग नोंदवून राज्याचे नाव उंचावले आहे. जळगावाला भुषण वाटावं असं कार्य मोक्षदाने केले आहे. प्रत्येकामध्ये विविध कला गुण असतात, ते कसे प्रदर्शित करावे आणि त्यासाठी कुटूंबाचे सहकार्य हे खुप गरजेचे असते, मोक्षदाला तिचे वडिल मधुकर पाटील, आई संगीता चौधरी, आजी-आजोबा, काका एन.जी.चौधरी आदिंचे सहकार्य लाभले आणि मोक्षदानेही मिळालेल्या संधीचे सोने केल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ.प्रशांत वारके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.व्ही.एच.पाटील, नरेंद्र पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एन.जी.चौधरी, प्रा.स्मिता चौधरी, नर्सिंगच्या मनिषा खरात आदिंची उपस्थीती होती. स्वागत रॅलीप्रसंगी जळगावच्या महापौर जयश्री महाजन, सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी आदिंनी मोक्षदाला पुष्पगुच्छ देत अभिनंदनाचा वर्षाव केला.
आनंद वाटतोय मोक्षदा आणि आम्ही तीन वर्षापासून परेडची प्रॅक्टीस करतो, आमच्यापेक्षाही मोक्षदाने खुप जास्त मेहनत घेतली आणि अखेरीस दिल्ली परेडमध्ये तिने सहभाग नोंदविल्याने खुप आनंद वाटत आहे, त्याल शब्दात व्यक्त करता येत नसल्याचे मोक्षदाच्या मैत्रिणींनी सांगितली.