<
कानळदा येथिल ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गुलाबरावजी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी त्यांच्या सोबत श्री.कैलास चौधरी (कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती),श्री.मुकुंद नन्नवरे(पंचायत समिती सदस्य धरणगाव),श्री.नवलसिंग राजे पाटील आदी उपस्थित होते.संस्थेचे चेअरमन श्री.डी.ओ.सपकाळे, सचिव श्री.राजेंद्रजी चव्हाण ,संस्थेचे सदस्य श्री.शरद भंगाळे,श्री.प्रमोद आनंदराव चव्हाण,श्री.विकास भंगाळे, प्राचार्य श्री.के.पी.चव्हाण सर यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.गुलाबरावजी पाटील यांचा सत्कार ग्रामीण शिक्षण संस्थेचे सदस्य श्री.विकास भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला..तसेच त्यांच्या सोबत आलेल्या मान्यवरांचा सत्कार वरील संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.पालकमंत्री यांनी आपल्या गतकाळी कानळदा गाव,विद्यालयाचे क्रीडांगण,क्रिकेट मॅचेस या आठवणींना उजाळा दिला व सोबत संस्था,विद्यालय व महाविद्यालय या कामकाजाविषयी माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.यावेळी श्री.आर.एन.पाटील सर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले,स्वागतगीत श्री.जी.एम.सपकाळे सर यांनी सादर केले.