<
भडगाव-“धर्म,पंथ,गरिबी,अंधश्रद्धा,कर्मकांड कर्मठपणा या गोष्टीवर गाडगेबाबा प्रहार करीत असे, ग्रामस्वच्छता,जलप्रदूषण, कृषी उत्पादन, मेहनत या विषयी शेतकऱ्याच्या व्यथासंबंधी ग्रामस्थांनी कृषी क्षेत्रात प्रामाणिक कामे केल्यास जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल,जातीभेदाच्या भिंतींवर प्रहार करणारे राष्ट्रसंतगाडगेबाबा”
असे ओजस्वी विचार सुनील पाटील यांनी व्यक्त केले.ते माऊली फाऊंडेशनच्या स्वच्छतेकडून समृद्धता या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी होते. आई गुंताबाई व माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमाता व संत गाडगेबाबां यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.त्यांत प्रथमच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.बांबरुड येथील सुप्रसिध्द शिवचरित्रकार व्याख्याते प्रा.सुनिल पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.प्रा.सुनिल पाटील यांनी “राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनावरील माहिती आपल्या व्याख्यानातुन दिली.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जीवनप्रवास सांगतांना त्यांनी त्यांच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकला.गाडगेबाबांनी समाजातील अज्ञान,अंधश्रध्दा,निरक्षरता,दारिद्रय,स्वच्छता,रुढी,परंपरा,व्यसनाधिनता,जातीयवाद याबाबतीत विविध दाखले देऊन मंत्रमुग्ध केले.
सदरप्रसंगी प्रा.सुनिल पाटील यांनी माऊली फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रम प्रसंगी प्रा.सुनिल पाटील यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची प्रतिमा,प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष मनोहर सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की भविष्यात माऊली फाऊंडेशन स्वतःचे यु ट्युब चँनल तयार करुन प्रा.सुनिल पाटील यांचे व्याख्याने संपुर्ण महाराष्ट्रभर ऐकवली जातील.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वैशाली शिंदे तर पाहुण्यांचा परिचय प्राचार्य श्री एस.पी.रोकडे तर सुत्र संचालन श्री.प्रवीण पाटील व गणेश पाटील सर यांनी केले व आभार प्रतिभा कुलकर्णी यांनीमानले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी व माऊली फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.