Sunday, September 21, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुऱ्हा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शरद युवा संवाद यात्रेची संवाद सभा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2022
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
कुऱ्हा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शरद युवा संवाद यात्रेची संवाद सभा संपन्न


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचे विचार युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली “शरद युवा संवाद २०२२” यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज कुऱ्हा काकोडा येथे संवाद सभा पार पडली सभा पार पडली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,चिटणीस संदिप पाटील, ललित बागुल,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, प स सभापती विकास पाटील, वक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले,युवक उपाध्यक्ष पवन पाटील,जि प सदस्य निलेश पाटील, माजी प स सभापती दशरथ कांडेलकर, राजु माळी, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, सरचिटणीस रवींद्र दांडगे ,मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, सरपंच सुनीता ताई मानकर,डॉ बि सी महाजन, रणजित गोयनका, पुंडलिक कपले, ओमप्रकाश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पिंप्राळा,उमरा, थेरोळा, धामणगाव व परिसरातील सुमारे २५० शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राजेश ढोले इच्छापूर यांची मुक्ताईनगर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे लोक खूप आहेत पवार साहेबांनी नेहमी तळागाळातील जनतेवर प्रेम केले. या जनतेला डोळ्या समोर ठेवून त्यांनी विविध योजना सुरू केल्या. १९९० मध्ये शरद पवारांनी फलोत्पादन कार्यक्रम राबवला. हा यशस्वी कार्यक्रम केंद्र सरकारनेही स्वीकारला. महाराष्ट्रासाठी ३ वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही शरद पवार मुख्यमंत्री असतानाच झाला. नाथाभाऊ रोहिणी ताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर जळगाव जिल्हयात राष्ट्रवादी ची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते दिसून येईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांनी गोरगरीब जनतेची कामे करून त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात व संघटन मजबूत करावे असे त्यांनी आवाहन केले

यावेळी बोलतांना ॲड.रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी खास युवा कार्यकर्त्यांसाठी या कार्यक्रमाची आखणी केली आहे. शरद युवा संवाद… म्हणजे युवकांशी संवाद… माझ्या युवा मित्रांना मी सांगेन राजकारणात मेहनत घेतली तरच यश मिळते. आपल्या समोर पवार साहेबांचेओठे उदाहरण आहे. त्यांनी शाळेत असताना १९५६ मध्ये गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठींबा देण्यासाठी सर्वात अगोदर शालेय विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला तो त्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा होता.नंतर महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून काम केले. बी एम सी सी महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे संघटन केले , तिथल्या निवडणुका जिंकल्या. अशाच एका विद्यार्थी कार्यक्रमात त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना आमंत्रित केले तेव्हा त्या कार्यक्रमातील पवार साहेबांचे भाषण ऐकून चव्हाण साहेब प्रभावित झाले त्यांनी त्यांना युवक काँग्रेसमध्ये आणले. राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीस असताना त्यांनी पक्षाचे प्रचंड काम केले. आणि नंतर वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांचेकडे चालत आले. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी राज्य पिंजून काढले. एस.टी. बसने राज्यभर दौरे केले.युवक कार्यकर्ते जोडले. राज्याचे प्रश्न, सामाजिक समीकरण याचा अभ्यास केला. नंतर देशभर पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील मोठमोठ्या नेत्यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केल्या, इतर राज्यातील मित्र जोडले. संसदीय पद्धतीचा अभ्यासही त्यांनी केला. भारताच नव्हे तर जग फिरण्यासाठी त्यांनी युनेस्को ची शिष्यवृत्ती मिळवली. त्यातून जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड आदी देशाला भेटी दिल्या तिथली राजकीय पक्षाची बांधणी कशी असते? संसदीय कार्य कसे चालते याचा अभ्यास केला यावेळी त्यांचे वय होते अवघे २६ वर्षे. होते

त्या पुढे म्हणाल्या की, शरद पवार साहेब घडले ते एका रात्रीतून नाही. त्यांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आणि कार्य करावे. केलेल्या कार्याचे योग्य ते मापन पक्ष करत असतो. साहेबांच्या या कार्यामुळेच वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी म्हणजे १९६७ मध्ये त्यांना चव्हाण साहेबांनी बारामती मधून विधानसभेची उमेदवारी दिली. स्थानिक नेत्यांचा प्रचंड विरोध असतानाही चव्हाण साहेबांना मात्र पवार साहेबांवर विश्वास होता. आमदार म्हणून काम केले यथावकाश दोन वर्षानंतर राज्यमंत्री म्हणूनही त्यांचा शपथविधी झाला.नंतर मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री पदाचा प्रवास केला. जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विविध योजना तयार केल्या महिलांना सैन्यदलात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरंक्षणमंत्री शरद पवार यांनी घेतला. लष्करात महिलांना ११ टक्के आरक्षण दिलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आणि राज्य महिला आयोग स्थापन करण्यात योगदान दिले. यातून एकाच गोष्ट लक्षात घ्या. सत्तेला प्राधान्य न देता संघटनेला प्राधान्य द्या. संघटनेचे प्रामाणिकपणे कार्य करा, मेहनत करा मग बघा सत्ता तुमच्याकडे स्वतः हून चालत येते. एकजुटीने काम करून येत्या निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून पक्षाचे हात बळकट करा असे त्यांनी आवाहन केले. आपल्या पक्षाच्या, सरकारच्या माध्यमातून आपल्या परिसरात राहिलेले विकासकामे पूर्ण करण्यासाठी नाथाभाऊ, मी व भैय्या साहेब कटिबद्ध असल्याचे, रोहिणीताई यांनी सांगितले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आज वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर अनुभव आणि कृषी, उद्योग, खेळ, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची खडान् खडा माहिती असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. शरद पवार साहेबांचा अनेक विषयांतील अभ्यास, अनुभव लक्षात घेता, त्यांच्याकडे सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते मार्गदर्शन घेण्यासाठी गेलेले दिसतात. सर्व जाती धर्माला न्याय देणारे नेते म्हणजे शरद पवार साहेब आहेत. प्रचंड विरोध पत्करून साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरण केले, रामदास आठवले, डॉ प्रकाश आंबेडकर, रा सु गवई व इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना खुल्या जागेवर निवडून आणून आमदार खासदार बनवले. अल्पसंख्याक समाजाला सुद्धा नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केला नवाब मलिक, हसन मुश्रीफ, डॉ फौजिया खान व इतर अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींना मंत्री आमदार खासदार बनवले तरी काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जातीयवादी पक्ष संबोधून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघाच्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत करून निवडणून आणले परंतु निवडून येताच त्यांनी आपल्या मूळ पक्ष शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. कधी ते अपक्ष म्हणवतात कधी पुरस्कृत तर कधी शिवसेनेचे त्यांना सर्व जागी फिरून येण्यात आनंद आहे. पुढील विधानसभेला ते भाजपचे तिकीट घेतील जामनेरमार्गे त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकीत ते दिसून आले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि नाथाभाऊ यांची ताकद आहे आता ही ताकद एकत्र झाली असून येत्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. नाथाभाऊ हे सर्व समावेशक नेते आहेत त्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाचे राजकारण केले नाथाभाऊ अल्पसंख्याक मंत्री झाल्यानंतर त्यांनी या खात्याच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला हे भाजप ला सहन झाले नाही परंतु आता नाथाभाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले असून राष्ट्रवादी हा जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. येत्या काही दिवसात नाथाभाऊ यांचा आवाज सभागृहात घुमणार तसेच रवींद्र भैय्या पाटील यांना सुद्धा सन्मानाचे पद मिळणार अशी त्यांनी आपल्या भाषणातून ग्वाही दिली.

यावेळी माणिक पाटील, गणेश तराळ, गोपाल पाटील, पुरुषोत्तम पाटील, विष्णू झाल्टे, संतोष कांडेलकर ,धनराज कांडेलकर ,तुळशीराम कांबळे ,हनीफ खान, विनोद मुंडे, गणेश विटे ,निंबा चौधरी, अनंता पाटील, मधुकर गोसावी, वसंत पाटील, संदीप पाटील ,भागवत वाघ ,विशाल रोठे ,शिवा पाटील, सूनील राजगुरे, पोपटराव आमोदे , हरलाल राठोड ,देशमुख राठोड, शांताराम इंगळे, कळू खिरडकर, अनंता पाटील,,निलेश पाटील, महादेव गाळकर , समाधान चिम,मिठाराम धुदले ,एकनाथ पाटील,रमेश पाटोळे, मयुर कुमार साठे , सुशील भुते, संतोष पाटील ,कान्हा चौधरी , पवन पाटील , राजू बोरसे , अविनाश पहाडे, देविदास पाटील, किरण नेमाडे ,शुभम खंडेलवाल, , शंकर मोरे ,रुपेश माहुरकर ,मनोज गोरले , ,अतुल ठाकूर, पवन म्हस्के, कुणाल साठे,,निखिल मालगे, छोटू गव्हाळे , भैया पवार , भूषण सोनवणे, गणेश भोलाणकर , नितेश राठोड भैया कांडेलकर ,भगवान वाघ, हरीश वाघ, कधीर शहा, गणी बाई, नयुम बाबा, बुडणं शहा,नानेश्वर गरड, रोशन वले ,अजय पाटील, देवेश कांडेलकर , सागर तायडे,रविंद बेलदार, दादाराव मेहंगे,विशाल रोटे यांच्यासह कुऱ्हा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जातीभेदांच्या भिंतीवर प्रहार करणारे खरे राष्ट्रसंत गाडगेबाबा – प्राचार्य सुनील पाटील

Next Post

गोदावरी स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात

Next Post

गोदावरी स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

श्री.संत ज्ञानेश्वर प्राथ. व माध्यम. विद्यालयात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

श्री.संत ज्ञानेश्वर प्राथ. व माध्यम. विद्यालयात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

“महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कायदे आणि समुपदेशकाची भूमिका – समाजकार्य महाविद्यालय जळगावतर्फे धानोरा येथे व्याख्यान”

“महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कायदे आणि समुपदेशकाची भूमिका – समाजकार्य महाविद्यालय जळगावतर्फे धानोरा येथे व्याख्यान”

“मुलींच्या आरोग्यासाठी समाजकार्य विद्यार्थ्यांचा उपक्रम”

“मुलींच्या आरोग्यासाठी समाजकार्य विद्यार्थ्यांचा उपक्रम”

अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूल मध्ये सीआयएससीई राष्ट्रीय मुलींची तायक्वांडो स्पर्धा देशभरातील ३०० खेळाडूंचा सहभाग; आजपासून रंगणार सामने

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या मार्गदर्शनात जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट पंचाची कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या मार्गदर्शनात जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट पंचाची कार्यशाळा संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications