<
राष्ट्रीय संघर्ष समीती बुलढाणा तर्फे ईपीएस ९५ पेन्शन लढा सूरू असून जळगाव जिल्हा संघटनेच्या सदस्यांनी काल तहसिलदार कार्यालयात जावून सन्मानपुर्वक जगण्यासाठी न्याय मिळावा अशी आर्त हाक निवेदनाव्दारे दिली आहे.
यात जिल्हाध्यक्ष म्हणून अरविंद नारायण भारंबे, उपाध्यक्ष रमेश बाबुराव नेमाडे,सचिव दिनकर निवृत्ती पाटील, तुकाराम पगारे हे सदस्य उपस्थीत होते. या निवेदनात आर्त हाक देतांना वस्तूस्थीती मांडून लवकरात लवकर न्याय मिळून सन्मानपुर्वक जगण्याचा न्याय मिळण्यासाठी विनंती केली आहे. संपुर्ण भारतात सूतगिरणी, साखर कारखाना, औद्योगिक कामगार, परीवहन मंडळ, राज्य विद्युत मंडळ , राज्य महामंडळ, को आप बँक, वृत्तपत्र समुहातील कामगार, या प्रमाणे खाजगी क्षैत्रातील १८६ प्रकारात काम करणारे ६७ लाख निवृत्त पेन्शनधारक सदस्य असून या पेन्शनधारकांना एकत्र आणण्याचे कार्य राष्ट्रीय संघर्ष समीती गेल्या ४ वर्षापासून करीत आहे. समीतीचे मुख्यालय बुलढाणा महाराष्ट्र येथे आहे. मा. कंमाडर अशोक राउत यानी २०१७ साली निवृत्त पेन्शन धारकांच्या समस्या जाणून घेत या समीतीची स्थापना केली. २००/— ते २५००/— इतक्या तुटपूंज्या निवृत्ती वेतनात उदारनिर्वाह करणे कठीण होते. गेल्या ११३० दिवसापासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण देखिल सूरू असून देशभरातून सदस्य यात सहभागी होत आहे. याचबरोबर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मा. खा. हेमामालीनी यांच्यासोबत संघर्ष समीतीच्या बैठका होउन मा. मोदीजीनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यात पेन्शनधारकांना ७५००/— अधिक महागाई भत्ता, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ३१ मे १७ पत्र परत घेवून २३ मार्च १७ नुसार जास्तीत जास्त पेन्शन मिळावे. पेन्शनधारक व वारसांना आयुष्यमान भारत योजनेत मोफत वैद्यकिय उपचार, २३ मार्च १७ च्या भविष्य निर्वाह निधी पत्रान्वये कार्यवाही व्हावी, सेवेत असतांना ज्या कर्मचा—यांनी पेन्शन पर्याय स्विकारला नाही त्यांना अंशदान स्विकारून ५०००/— अधिक महागाई भत्ता मिळावा. अशा मागण्या केलेल्या आहेत.