<
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) – जागतिक बँक अर्थसहाय्यीत कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत , सदर अर्ज हे शेतमाल, शेळया ( मास व दुध) आणि परसबागेतील कुक्कूटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासांठी आहेत.
अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती http://www.smart_mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी, त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडुन शेतमाल आधारीत मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रकल्प संचालक, आत्मा, प्लॉट नं. 10, पुष्कराज बिल्डींग दिक्षीतवाडी, जळगाव कार्यालयात तसेच इतर उपप्रकल्प संबंधीत लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांचे कार्यालयात ऑफलाईन अर्ज 31 मार्च, 2022 सायंकाळी 5.00 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.