Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘कान्हदेशातील गांधी’ वेबिनार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव दि. 09 प्रतिनिधी – कान्हदेशाला संपन्न ऐतिहासीक परंपरा लाभली असून स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्त्वाचे योगदान कान्हदेशवासीयांचे आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी ऊर्जाशील ठरलेल्या या पावन भूमिमध्ये महात्मा गांधीजींनी भेट दिली. महात्मा गांधीजींच्या 1927 च्या जळगाव भेटीला 95 वर्ष पूर्ण होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावर वेबिनाराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील महात्मा गांधी स्टडी अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यातर्फे केले आहे.

 दि.11 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.00 ते 11.15 वाजता ‘कान्हदेशात गांधी’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. विश्वास पाटील वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधीजींचे पणतू श्रीमान तुषार गांधी असतील. ऑनलाइन कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशनकरून सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावरील संशोधनात्मक बाबींवर डॉ. विश्वास पाटील मार्गदर्शन करतील. महात्मा गांधीजी तिलक स्वराजफंडासाठी 1921, खादी फंडासाठी 1927 आणि स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण पान असलेल्या फैजपूरचे कॉंग्रेस अधिवेशनासाठी 1936 ला कान्हदेशात आले होते. 

त्यांच्या 1927 मधील भेटीस 11 फेब्रुवारील 95 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सहभागाचे प्रमाणपत्रासाठी https://forms.gle/8ZvghebyZ5BtL7T9A येथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कान्हदेशातील गांधी या वेबिनारमध्ये https://jains.webex.com/jains/j.php?MTID=ma6ebe216b3cc3bb0710e33b36b35209b या लिंकच्या माध्यमातून सहभागी होता येईल. यासाठी मीटिंग नंबर (Meeting number) 2555 659 0649, पासवर्ड (Password) GandhiKhandesh असा असेल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

आजचे महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय…

Next Post

तब्बल 500 किलो रंगोळीतून साकारली “लतादीदींची” प्रतिकृती

Next Post
तब्बल 500 किलो रंगोळीतून साकारली “लतादीदींची” प्रतिकृती

तब्बल 500 किलो रंगोळीतून साकारली "लतादीदींची" प्रतिकृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेश मधील केंद्रीय अभ्यासमंडळावर नियुक्ती;महाराष्ट्र मध्यप्रदेश सह पाचव्या विद्यापीठात वर्णी

प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेश मधील केंद्रीय अभ्यासमंडळावर नियुक्ती;महाराष्ट्र मध्यप्रदेश सह पाचव्या विद्यापीठात वर्णी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications