<
जळगाव:9 फेब्रुवारी सर्व संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताच्या गणकोकीळा स्व. लता मंगेशकर यांना ओजस्विनी कला महाविद्यालयाने 500 किलो रांगोळीतुन साकारलेल्या प्रतिकृतीतुन आदरांजली अपूर्ण करण्यात आली.
40 बाय 40 या आकारात साकारलेल्या या भव्य रांगोळीच्या प्रतिकृतीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. लतादीदी या भारताचे भूषण असल्याने यात तिरंगा ध्वज देखील साकारण्यात आला आहे.
तब्बल 5 शिक्षक आणि विद्यार्थी यांनी 24 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही रांगोळी पूर्णत्वास आली. रांगोळीची संकल्पना ओजस्विनी कला विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. राजेंद्र सरोदे यांची आहे.
रांगोळी रेखाटण्यात भूषण पाटील, आयुषी जैन, लक्षिता जैन, कुणाल जाधव, रिटा घुगे, सागर चौधरी, ईशा भावसार, ज्योती सहानी,श्रध्दा सहानी यांनी सहकार्य केले.
या उपक्रमासाठी के.सी.ई चे अध्यक्ष मा. नंदकुमार बेंडाळे,कोषाध्यक्ष डी टी पाटील, दुष्यंत जोशी, राजेश पुराणिक, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना. भारंबे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर ,प्रा. ए.आर. राणे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. कपिल शिंगाने, प्रा. केतकी सोनार, संजय जुमनाके आदी उपस्थित होते.