<
आज दि.१२ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार रोजी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान आठव्या टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला पडसाळे गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद हा मिळत आहे.
यावल तालुक्यातील पडसाळे गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास आठवे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियान ग्रामपंचायत जवळ पडसाळे तालुका यावल येथे घेण्यात आले. व या अभियानास एकूण ४७९ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन हुसेन तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे हुसेन तडवी,(माजी सरपंच ) रमेश सावळे, मजीद तडवी (ग्रामसेवक ), रुस्तुम तडवी (उपसरपंच ), राजू तडवी, मीनाताई तडवी मेहमूद तडवी (पोलीस पाटील ), सुलमान तडवी रमेश सावळे, कमाल तडवी, अशरफ तडवी, फिरोज तडवी, मेहमूद तडवी, बबिता तडवी, दिपक पाटील, एकनाथ भालेराव, सलीम तडवी इनुस तडवी, छबीर तडवी,आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास
सागर लोहार,मनोज बारी, विशाल बारी ,हर्षवर्धन मोरे,अक्षय राजपूत जयवंत माळी चेतन कापुरे शुभम सोनवणे ,यांचे योग्य सहकार्य लाभले.