<
जळगाव -(क्राईम रिपोर्टर – अनुप पानपाटील) आज सत्यमेव जयतेने योगेश पाटील यांच्यावर झालेला बलात्काराचा खोटा आरोप ही बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी संबंधित महिले प्रयन्त पोहचल्यावर महिलेने सत्यमेव जयते यांच्याशी संपर्क साधून अर्ज सादर करून या बातमीचे खंडन केले आहे. महिलेने अर्जात म्हटले आहे की, आपण आपल्या लोकप्रिय सत्यमेव जयते या ऑनलाइन न्युज पोर्टल वर योगेश पाटील यांच्यावर झालेला बलात्काराचा खोटा आरोप अशी बातमी प्रकाशित केलेली असून ती बातमी खोटी आहे. मी योगेश पाटील यांच्यावर केलेला आरोप हा खोटा नसून तो खरा आहे.
मात्र रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी आपणास दिलेली माहिती ही खोटी आहे व न्यायालयात मी दिलेला जबाब १६४ नुसार गोपनीय आहे व सदर जबाबाची माहिती बाह्यस्त यंत्रणेला देण्याचा अधिकार नसल्याचे ही पिडीतीने सांगितले आहे. तसेच मी आजारी असल्याकारणाने कोणत्याही परिस्थितिला सामोरे जाण्यास माझी परिस्थिती नाही. तरी मला न्याय मिळावा अशा प्रकारचा पीडित महिलेचा अर्ज सत्यमेव जयते ऑनलाइन न्युज या पोर्टल ला प्राप्त झाला आहे.या प्रकरणा संदर्भात आम्ही १० जुलै रोजी पीडित महिलेशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता महिलेशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आम्ही अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता संबंधित महिलेने न्यायालयात पत्र सादर करून माघार घेतली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी आम्हाला दिली होती.