<
भडगाव प्रतिनिधी:- येथील जळगाव- चांदवड महामार्गावरील ग्रामीण रुग्णालया समोर मोटारसायकल व इको व्हॅन गाडीच्या अपघातात १५ वर्षीय मुलासह १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला मंगळवारी रात्री ९ वाजता हा अपघात झाला
भडगांव ग्रामीण रुग्णालच्या समोरील चौफुलीवर गतिरोधक नसल्याने सातत्याने अपघात सत्र सुरू झाले आहे .
आज १५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोटारसायकल व एम एच २७ – ए सी – ६८४३ या क्रमांकाच्या इको व्हॅन गाडीचा मोठा अपघात झाला. यात लाडकूबाई माध्यमिक शाळेत इयत्ता ९ वी ला शिकणाऱ्या विद्यार्थी अमोल दीपक सोनवणे हा त्याच्या भावाचा मित्र पंकज भारत भोई या सोबत कामा निमित्त मोटरसायक वर गेला होता. याच वेळी हायवेवरून जाणाऱ्या इको व्हॅन व मोटारसायक चा वळणावर भीषण अपघात झाला यात अमोल सोनवणे राहणार यशवंत नगर खालची बर्डी या १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला . तर पंकज भारत भोई (वय १८ ) राहणार भोईवाडा यांस हात पाय व पोटाला गंभीर फ्रॅक्चर झाल्याने त्यास पाचोरा येथे तातडीने दाखल केले.त्याची स्थिती अतिगंभीर असल्याने त्यास अधिक उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले मात्र जळगावातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यावेळी अपघात स्थळी युवकांची मोठी गर्दी झाली होती.दरम्यान अपघात होताच इको व्हॅन चा ड्रायव्हर गाडी जागेवर सोडून पळून गेला.
घटनास्थळी नागरीक व पोलीस कर्मचारी विलास पाटील, स्वप्नील चव्हाण, पोलीस पाटील भूषण पाटील आदी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली .
तातडीने गतीरोधक बसवा – नरेंद्र पाटील यांची मागणी –
भडगाव शहरातून भर गर्दीच्या भागातून हायवे जातो . त्यामुळे येथील भागात सातत्याने अपघात होत आहे . नागरिकांनी वारंवार सांगुणही हायवे प्राधिरकण चे अधिकारी लक्ष देत नाही. येथील शासकीय आयटिआय, ग्रामीण रुग्णालय चौफुली , शिवनेरी गेट समोर , पाचोरा चौफुली , चाळीसगाव चौफुली, हॉटेल सदिच्छा व संस्कृती हॉटेल जवळील रस्त्याला गेलेले तडे बुजुन येथे तातडीने गतिरोधक बसबीण्यात यावेत अशी मागणी नरेंद्र रमेश पाटील व यशवन्त नगर च्या नागरिकांनी केली आहे . प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा सातत्याने होणाऱ्या अपघातांना हायवे चे अधिकारी व प्रशासन जाबाबदार राहील अशी भूमिका यावेळी मांडन्यात आली . रात्री हायवे अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही , मात्र पोलिसांनी हमी देत रस्त्यावर गतिरोधक साठी सूचना देणार असल्याचे सांगितले.
शिवाय येथील गतिरोधक तात्काळ न बसविल्यास अपघात झाल्यास त्याला जबाबदार धरून संबधीत अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हि करण्यात आली आहे .