<
आज दि.18/2/2022 स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात स्कूलचे चेअरमन श्री. इंजि. नरेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिवगर्जना देऊन उत्साहात सुरुवात करण्यात आली, “जय भवानी जय शिवाजी “या घोषणेने संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण पेरले गेले .जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत स्कूलचे चेअरमन श्री नरेश चौधरी, स्कूलच्या प्राचार्या परवीन मॅम व समन्वयक गजानन पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. शाळेतील शिक्षक श्री गजानन शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून दिले, शाळेतील शिक्षिका सौ.आशा सावकारे यांनी शिवजयंती उत्सव आणि राजमुद्रा याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाणातून शिवाजी महाराजांचा इतिहास पटवून दिला.
शाळेतील उत्सवाचे वातावरण क्रीडाशिक्षक श्री. ज्ञानेश्वर पवार व विधार्थी नि सादर केलेल्या पोवाडा व नाट्याने नवचैतन्य निर्माण केले.
त्याच बरोबर शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची माहिती विद्यार्थ्यांनी त्या वेशभूषेत करून दिली. शिवाजीमहाराजाची घोड्यावरुन शाळेच्या परिसरात रॅली काढण्यात त्यात शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला . शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले बनवून विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला .या कार्यक्रमात शिक्षक शाळेतील शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्साह बरोबरच बस ड्रायव्हर व चालक यांचा उत्साह देखील गगनाला भिडलेला होता.