Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव – गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्यात सूज असल्याकारणाने गुडघेदुखीच्या समस्येने महिला त्रस्त होती, काही तपासण्यांवरुन तज्ञांनी लक्षात आले की हा हाडांचा ट्यूमर असून त्या ४२ वर्षीय रुग्ण महिलेवर जायंटसेल ट्यूमर (ॠळरपीं उशश्रश्र र्ीीोीं) साठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग विभागप्रमुख डॉ.दिपक अग्रवाल यांच्या ओपीडीत एक रुग्ण गुडघेदुखीची समस्येने त्रस्त होवून आली होती. सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री जाणून घेतली असता रुग्ण महिला पडली किंवा काही मार लागला असे काहीही नव्हते, तरीसुद्धा वेदना तीव्र होत्या, दरम्यान प्राथमिक तपासणी डॉक्टरांनी केली त्यानंतर एक्स रे काढून येण्याचा सल्ला दिला. यात रुग्णाच्या उजव्या गुडघ्यात सुज आणि तेथील हाड तुटलेले असल्याचे निर्दशनास आले. थोडी सखोल तपासणी केली असता तो हाडांचा ट्यूमर असल्याचेही निष्पन्न झाले. त्यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता.

जर या शस्त्रक्रियेसाठी आणखी उशिर केला गेला तर तो छातीत पसरण्याची दाट शक्यता असते, याबाबत नातेवाईकांचे समुपदेशनही डॉक्टरांनी केले. नातेवाईकांनाही ते पटले आणि त्यांनी तात्काळ शस्त्रक्रियेस संमती दिली. यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल यांनी जायंटसेल ट्यूमरची शस्त्रक्रिया केली, त्यांना भुलतज्ञांसमवेत ऑर्थोपेडीक रेसिडेंट डॉ.परिक्षीत पाटील आदिंचे सहकार्य लाभले.

लिंबूच्या आकाराची भलीमोठी गाठ
या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या गुडघ्याच्याजागी मोठ्या लिंबूच्या आकारातील गाठ अर्थात ट्यूमर काढण्यात आला आणि रुग्णाच्या कमरेतून एक हाड काढून गुडघ्याच्याजागी त्याचे प्रत्यारोपण करण्यात तज्ञांना यश आले. आगामी पाच वर्षात जायंटसेल ट्यूमरचा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे नियमित तपासणी करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी यावेळी दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बर्ड फ्ल्यू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी

Next Post

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

Next Post
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo