<
जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च एमबीए महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय स्तरीय ऑनलाइन फॅक्लटी डेव्हलपमेंट या विषयावर यशस्वीरित्या पार पडला. दोन सत्रांमध्ये हा कार्यक्रम झाला.
पहिल्या सत्रा डॉ.आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अॅण्ड रिसर्च नागपूर येथील प्रा.डॉ.रुही बखारे यांनी रिसर्च डिझाईन, सॅम्पल साईझ, डाटा कलेक्शनवर व्याख्यान दिले. दुसर्या सत्रात डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे येथील प्रा. डॉ. ललित प्रसाद यांनी अॅनालिसीस ऑफ डाटा, हायफोथिसीस टेस्टींग याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.आफ्रिन खान यांनी केले. प्रास्तविक महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. भाग्यश्री पाटील व डॉ. अनुभूती बाउसकर यांनी केले. प्रा. श्रुतिका नेवे व प्रा. अश्विनी सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला.