<
भडगाव : – (प्रतिनिधी) – आज दि .23/02/2022 रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित टी .आर. पाटील विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय वडजी या शाळेच्या वतीने संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेमार्फत “तात्यासाहेब जोतिराव फुले समता पुरस्कार ” प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन नानासाहेब प्रतापराव हरि पाटील , श्यामकांत भोसले , ए .एस .पाटील यांनी केले .. संत गाडगेबाबा स्वच्छतेचे पुजारी या विषयावर निबंध स्पर्धा आणि वत्कृत्व स्पर्धा विदयालयात घेण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयी खूपच रोचक माहिती प्राचार्य ए .एस . पाटील यांनी सांगितली .
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ए .एस. पाटील, भडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व किसान शिक्षण संस्थेचे संचालक श्यामकांत अशोक भोसले , बी .वाय. पाटील तसेच सर्व शिक्षक बंधु आणि भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.