<
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा संवर्धन सप्ताह निमित्त मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदरील प्रदर्शनाचे उदघाटन जळगाव महसूल विभाग तहसीलदार मा.श्री. महेंद्र माळी व शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. दिलीप कुमार चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात अध्यात्मिक साहित्य, ज्ञान कोश,विश्वकोश, बालसाहित्य,कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य, परमपुज्य सानेगुरुजी,व.पु.काळे, शांता शेळके,विं.दा.करंदीकर इ.साहित्य मांडणी केली होती. सदरील प्रदर्शनाला विद्यार्थी ,शिक्षक व पालकांनी भेट दिली व अभिप्राय नोंदविला व मराठी साहित्य व साहित्यीकांविषयी माहिती जाणून घेतली. सदरील उपक्रमासाठी मा.मुख्याध्यापक श्री. दिलीपकुमार चौधरी व पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता झांबरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल श्रीमती.रोशनी बाविस्कर व बी.एड.आंतरवासिता छात्राध्यापक यांनी केले.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक मा.श्री. सतिष भोळे,श्री. आर.एन.तडवी सर,श्री. पराग राणे,श्रीमती प्रतिभा नेहते.इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. चंदन खरे, श्री. अशोक तायडे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.