<
जळगाव – (येथील) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने (रासेयो) चे विशेष हिवाळी शिबिर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात संपन्न. शिबिराच्या समारोप समारंभास मा. कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन, प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार, डॉ. एस.टी. भूकन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. वायूनंदन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना साक्षरता आणि आरोग्य शिक्षण गरजू आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे सांगून संघ भावना आणि संघशक्तीचे महत्व अधोरेखित केले. त्याचबरोबर कुलगुरू म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तद्नंतर डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासातील रासेयोचे महत्व स्पष्ट केले. डॉ. भूकन यांनी विशेष शिबिराच्या माध्यमातून घडणाऱ्या व्यक्तीमत्व विकासाचे महत्व पटवून दिले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी सरांनी स्वागतपर मार्गदर्शन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाहुजा यांनी पाहुण्यांचे परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हरिश्चंद्र तावडे या विद्यार्थ्यांने मान्यवरांचे आभार मानले. ह्रुषीकेश रावेरकर, श्रद्धा चुगरा, यश कुमावत, सुजाता वाघोडे या विद्यार्थ्यांनी शिबिरा संदर्भात मनोगत व्यक्त केले.
सात दिवस चाललेल्या शिबिरात विद्यापीठ परीसराची साफसफाई, रोपांची छाटणी, शिक्षणमंत्री एट ऊमवि कार्यक्रमासाठी मंचाची सजावट ईत्यादी स्वरूपात श्रमदान केले आणि विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून सामाजिक प्रश्ना संदर्भात संवेदनशीलता निर्माण करण्यात आली.