<
मराठी भाषा संस्कार करते.यामध्ये हृदय जोडणारा जिव्हाळा,आत्मीयता,आपुलकी, माणुसकी आहे ज्ञानोबा,तुकोबा नामदेव,रामदास स्वामी अशा संतपरंपरेने चिरंतन असे जीवनावश्यक ज्ञानभांडार असून मराठीची अमृतमय गंगा शेकडो बोलीभाषेला सामावून निरंतन प्रवाही आहे मराठी भाषा हा महाराष्ट्राचा मुलाधारच आहे कारण महाराष्ट्राची निर्मितीच भाषावार प्रांतरचनेच्या तत्वानुसार झाली होती. मराठी चे संवर्धन हे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे जी भाषा ११ कोटी लोक बोलतात. मराठी भाषा ही एक समृद्ध सुंदर सर्वस्पर्शी भाषा म्हणुन संवर्धित आहे. ज्या भाषेत श्रेष्ठ साहित्य निर्माण होत असते. ज्ञानार्जन आणि मनोरंजन ही साहित्याचे पैलू आहेत साने गुरुजींच्या गोष्टी, संत तुकाराम , नामदेव ,ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, कुसुमाग्रज,व कवी, लेखक आणि साहित्यिक हेच भाषेची सेवा करतात यामुळेच मराठीबाणा चालतो” असे विचार प्रा सुरेश कोळी (अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगाव) यांनी मांडले .
दि २७ रोजी सायांकळी ७ वा यशवन्त नगर येथे राजा शिवछत्रपती बहुउद्देशीय संस्था व म. सा. प. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मराठी राजभाषा या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शासकीय औदयोगिक केंद्राचे दिलीप चव्हाण, निवृत्त वरिष्ठ लाईनमन रमेश पाटील, प्रा. डी.बी.कोळी
, सचिन नेवरे, माजी ग्रा. प सदस्य रविंद्र मोरे, प्रकाश पगारे, अक्षय कंदिलकर,पत्रकार नरेंद्र पाटील, युगल भोई,टोनगाव पोलीस पाटील भूषण पाटील स्वरूप पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.बी.कोळी यांनी तर सूत्रसंचालन नरेंद्र पाटील व आभार भूषण पाटील यांनी मानले.
शालेय युवक युवती , वृद्ध आदींना भाषा विषयांसह इतर विषयांचे प्रभुत्व प्राप्त होण्यासाठी साठी व येथील नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळावे म्हणून आगामी काळात शहरातील सर्वात मोठे भव्य वाचनालय व अभ्यासिका वर्ग यशवन्त नगर येथे होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नरेंद्र पाटील सांगितले .