<
3 मार्च – “जागतिक श्रवण दिन”
3 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. दिवसेंदिवस कर्णबधिरतेचे प्रमाण वाढत आहे.श्रवण शक्तीचे नुकसान टाळण्यासाठी, कानाबद्दल व ऐकण्याबद्दलची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल जनतेमध्ये जागृती वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना विशिष्ट थीम निश्चित करते. यावर्षी “आयुष्यभर ऐकण्यासाठी काळजीपूर्वक ऐका” असे थीम ठरवण्यात आले आहे. प्रचंड मोठ्या आवाजांचा श्रवण शक्तीवर वाईट परिणाम होतो, या संदर्भात खास काळजी घेणे आवश्यक आहे. श्रवणक्षमता कमी होण्याची काही कारणे अगदी सहजपणे टाळले जाऊ शकतात. सर्व वयोगटातील जनतेमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणे खूप आवश्यक आहे. कमी ऐकू येण्याचा मुलांच्या भाषेच्या विकासावर खोलवर परिणाम होऊ शकतो, शालेय शिक्षणावर परिणाम होतो,तरूणांना नोकरी मिळण्यास अडचणी येतात, वृद्धांमध्ये एकाकीपणाची भावना वाढू लागते. कानाची ऐकण्याची योग्य काळजी घेऊन चांगले ऐकणे अगदी सहजपणे शक्य आहे, तेव्हा कानाबद्दल, ऐकण्याबद्दल काहीही समस्या असल्यास कान नाक घसा तज्ञ यांना भेट द्या .
डॉ. स्वेतल अमित चोपडे.
कान नाक घसा तज्ञ.
मुंबई.