<
मुंबई : ग्रामीण भागातील ररस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत एशियाई विकास बँकेने (एडिबी) केंद्र सरकारला 1 हजार 440 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यांमधील ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे .
दरम्यान गाव तिथे रस्ता या संकल्पनेच्या आधारे गावागावात रस्त्यांची सोय केली जात आहे. यावेळी एडीबी बँकेच्या वतीने केंद्र सरकारला हे कर्ज देण्यात येत आहे. त्यामुळे गावातील रस्त्यांची लवकरच मार्गी लागणार आहे.
नॉर्थ ब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयात एडीबी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सब्यासाची मित्रा आणि केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव समीर खरे यांनी करारावर स्वाक्षर्या केल्या . या करारामुळे राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होऊन या भागातील शेती उत्पादकता वाढेल असे खरे यांनी सांगितले .
2 हजार 152 किमी रस्त्यांचा विकास
राज्यात रस्त्यांचे मोठे जाळे असून एकूण रस्त्यांपैकी दोनतृतीयांश रस्ते हे ग्रामीण भागातील आहेत . या करारानुसार राज्याच्या 34 जिल्हयांतील 2 हजार 152 किलोमीटर लांबीच्या 799 रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे .