<
जळगाव – (प्रतिनिधी) – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आणि बी. एस.डब्ल्यू. प्रथम आणि एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाचे ग्रामीण शिबिर तालुका रावेर पाल येथील सातपुडा विकास मंडळ या संस्थेत ५ मार्च २०२२ ते ११ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित केले गेले आहे.
आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शिरीषदादा चौधरी , शिबिराचे उद्घाटक खडसे विद्यालय मुक्ताईनगर येथील प्राचार्य मा. डॉ. व्हि आर. पाटील , व माजी सैनिक श्रीयुत रवींद्र पाटील , संस्थेचे सचिव प्राचार्य मा. डॉ. पी. आर. चौधरी , सातपुडा विकास मंडळ पाल या संस्थेचे सचिव मा. अजित पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी , ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. यशवंत महाजन , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी ग्रामीण शिबिर समन्वयक डॉ. कल्पना भारंबे , डॉ. सुनिता चौधरी मंचावर उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. कल्पना भारंबे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक हे शिबिरात श्रमसंस्कार , सहजीवन , आत्मसात करतील आणि यातूनच ते आत्मकेंद्रित होऊन राष्ट्रशक्ती साठी प्रेरित होण्याचे धडे या सात दिवसांमध्ये ते प्राप्त करतील. तसेच ग्रामीण शिबिरामध्ये ग्रामीण जनजीवनाची वैशिष्ट्ये प्रत्यक्षरीत्या विद्यार्थी हे अनुभवतील या सात दिवशीय शिबिरामध्ये दिनचर्या हि सकाळी उठल्यापासून प्रार्थना , श्रमसंस्कार , भोजन , आणि दुपारच्या सत्रात निरनिराळ्या विषयांवर तज्ज्ञ व्यक्तीकडुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे मिळणार आहे. तसेच सायंकाळी गटचर्चा व सायंकाळचे भोजन आणि दिवसभरातील अनुभव कथन अशा प्रकारे या स्वयंसेवकांची दिनचर्या असणार आहे. आणि या सर्व अनुभवातून स्वयंसेवकांना , विद्यार्थ्यांनां हे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन हे तुळशी वृंदावन या रोपाला पाणी वाढवून करण्यात आले.उद्घाटकीय मनोगतात माजी सैनिक श्री. रविंद्र पाटील यांनी स्वयंसेवक विद्यार्थ्यांना देशाबद्दलचे ऋण व्यक्त करतानां सैनिक या नात्याने माझ्या आई- वडीलांच्या अगोदर जर मला देशाचं नाव लावता आलं तर मी खरंच माझं भाग्य समजेल. या भावनेनतुन देशाबद्दल ऋण व्यक्त केलं. सोबतच जी जी खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. आर. पाटील यांनी राष्ट्रीय स्वयं सेवा योजनेची स्थापना हि युवाशक्ती हीच खर्या अर्थाने राष्ट्रशक्ती आहे. आणि याच युवाशक्तीच्या माध्यमातून आपण राष्ट्रबद्दलची आत्मीयता प्रेम भावना हि याच वयोगटात रुजावी या हेतूने १९७४ या वर्षा मध्ये २ ऑक्टोंबर हे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे १०० वे जयंती वर्ष असल्याने २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्थापना झाली. हा मूळ उद्देश युवकांना लक्षात आणून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर व ग्रामीण शिबिर सातपुडा विकास मंडळ पाल या परिक्षेत्रात आयोजित होत असल्याने विद्यार्थी मित्रहो आपणास खऱ्या अर्थाने श्रमसंस्कार सहजीवन आदिवासी जीवन ग्रामीण जीवन हे बघायला मिळेल याचा पुरेपूर आनंद प्रत्येक स्वयंसेवक विद्यार्थ्याने घ्यावा तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाला जास्तीत जास्त प्रेरणा देण्यासाठी शिबिरातील सर्वच उपक्रमांमध्ये उत्साही पद्धतीने सहभाग नोंदवावा ही अपेक्षा व्यक्त करतो.
संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक तथा ग्रामीण शिबिरातील विद्यार्थ्यांनां थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांच्या जीवनपटावरील काही प्रसंग सांगितानां सर्वोदय आश्रमाची स्थापना करून ग्रामस्वराज्य या संकल्पनेतून हा परिसर फुलला आहे. ब्रिटिश राजवटीत या परिसरामध्ये जनतेला देखील त्यांच्या विकासाकरिता शिक्षण आरोग्य रोजगार प्राप्त होवुन मूलभूत गरजांची उपलब्धी ही या थोर पुण्यात्मा कडून झाली आणि आज संस्थेचे अध्यक्ष तथा रावेर यावल मतदार संघाचे आमदार आमचे प्रेरणास्थान शिरीषदादा हे कर्मयोगी धनाजीनाना आणि बाळासाहेबांचे विचार , संकल्पनांना पूर्णत्वास करून. आजच्या काळाची दिशा बघता विविध सुविधा या परिसरात पुर्ण करुन जास्तीत जास्त विकास करण्याचे ध्येय दादा पूर्ण करतात आहे.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिरीष दादा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना तसेच ग्रामीण शिबिराच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेत जेव्हा जेव्हा आपणास व्यासपीठ मिळते. तेव्हा तेव्हा त्या व्यासपीठावर आपण सहभागी होऊन आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे. जेणेकरून आपले व्यक्तिमत्व फुलते बहरते व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी जसं अध्ययन-अध्यापन हे महत्त्वाचे आहे. तसेच साहित्यिक , सांस्कृतिक , कला क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे. आणि त्याचबरोबर आजच्या या विशेष शिबिर तथा ग्रामीण शिबिरातून पुढील सात दिवसांमध्ये मित्रहो श्रमसंस्कारातून सहजीवनाचा आनंद या ठिकाणी आपण घेणार आहात. आनंद घेत असतानां परिसरात शिवारफेरी मारत असतानां आदिवासी जमातीतील पावरा समाजाची कुटुंब पद्धतीचे आपण जरूर अभ्यास करावा जेणेकरून आपणास स्वच्छतेचे महत्व काय आहे. हे याठिकाणी निदर्शनास येईल. राष्ट्रीय सेवा योजना Not me But You या मुळ उद्देशाला पूर्णरूप देतानां शिरीषदादांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक गित म्हटलं “तुम बेसहारा हो तो , किसी का सहारा बनो” हे गित गायले आणि या गाण्याचा नेमका अर्थ विद्यार्थ्यांनां समजावून सांगताना आपण स्वतःला जरी एकटे समजत असलो. तरी आपण कुणाच्या तरी मदतीला येऊ शकतो. हि भावना एकमेकांप्रती असली पाहिजे. एकमेकांना मदत करीत असलो तर त्यातूनच मानवी मनाचे घट्ट नाते विणले जाते. समाजकार्याचे विद्यार्थी म्हणून समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामाजिक अभियंते हा असल्याने तुमच्या वर्तनामध्ये निश्चितच वरील सर्व गोष्टी या दृष्टिक्षेपात पडतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते डॉ. दीपक महाजन , डॉ. योगेश महाजन , सातपुडा विकास मंडळ या संस्थेचे डॉ. धीरज नेहते , श्री मयूर नारखेडे , महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी प्रवीण जोशी , चेतन नारखेडे आणि राष्ट्रीय स्वयं सेवा योजनेचे स्वयंसेवक तथा बी.एस.डब्ल्यू. प्रथम आणि एम. एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. निलेश चौधरी यांनी मानले.