भडगाव :प्रतिनिधी
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित टी .आर. पाटील विदयालय व कनिष्ठ महाविदयालय वडजी या शाळेत इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षा संदर्भात दक्षता समिती सहविचार सभा व पालक सभा संपन्न झाली. या सभेच्या *अध्यक्षस्थानी कैलास रामदास पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव पान पाटील , दिलीप माधवराव पाटील , भिकन अभिमन पाटील , सरपंच मनिषा गायकवाड , विजय अभिमन पाटील , ग्रामविकास अधिकारी राठोड , सुधाकर पाटील , स्वदेश पाटील उपस्थित होते . विद्यालयाचे प्राचार्य ए .एस. पाटील यांनी परीक्षेचे बदललेले नियम , दहावीची परिक्षा कशी सुरळीत पार पडेल आणि त्यासाठी पालकांचे सहकार्य याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.बी.वाय .पाटील यांनी काही मार्गदर्शनपर सुचना केल्या . पालक म्हणून देविदास अमृतकर यांनी आपले विचार मांडले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन वाय . ए .पाटील यांनी केले .बऱ्याच पालकांची उपस्थिती यावेळी होती . यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ए .एस .पाटील यांचे सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .