<
देशमुख महाविद्यालयात अर्थसंकल्पावर व्याख्यान
देशमुख महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न
केंद्रीय अर्थसंकल्प पायाभूत सुविधांना प्राधान्य देणारा आहे. मात्र येणाऱ्या काळात
पेट्रोल, डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढतील. त्याचप्रमाणे
शिक्षण, कृषी, आरोग्य या बाबींवरील अपेक्षित खर्च अर्थसंकल्पात दिसत नाही.
विषमुक्त शेतीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु
पगारदार नोकरदारांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प म्हणता येईल.
यात नदीजोड योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. पण
ऑनलाइन शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची वानवा दिसून येते. असे असले तरी
ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
अंगणवाड्यांना सक्षम करण्यासाठी योजना या अर्थसंकल्पात दिसतात. तसेच
कौशल्याधारीत शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे.
स्टार्टअपला चालना देऊन स्वयंरोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
सर्व गोष्टींमधून सरकारला कर संकलन वाढवायचे आहे. या पाठीमागे
नागरिकांनी अधिकाधिक खर्च करावा हा सरकारचा हेतू दिसून येतो. असे प्रतिपादन शेंदुर्णी येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. श्याम साळुंखे यांनी केले.
सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित ‘वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते उद्घाटक व वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी त्यांचे ‘अर्थसंकल्प २०२२’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक व भूगोल विभागप्रमुख डॉ.एस.डी. भैसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.ए.कोळी यांनी केले तर वक्त्यांचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख डॉ.सचिन हडोळतीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गजानन चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ.बी.एस.भालेराव यांनी केले. या प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. एल.जी.कांबळे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.एन.व्ही.चिमणकर, प्रा. डी.ए. मस्की, ग्रंथपाल प्रा. रचना गजभिये, मराठी विभागप्रमुख डॉ.अतुल देशमुख, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. जे.जे.देवरे, इतिहास विभागाचे प्रा.प्रदीप वाघ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.