<
भडगाव – (प्रतिनिधी) – 1975 मध्ये युनोने 8 मार्च हा “जागतिक महिला दिन” म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर केले. तेव्हापासून आजतागायत आपण सर्व 8 मार्च हा “जागतिक महिला दिन” म्हणून साजरा करत आहोत.
प्रत्येक व्यक्ती आपल्या माता-भगिनींचा सन्मान व आदर रोज करतच असते. परंतु आजच्या दिवशी “स्त्री” ही माता, भगिनी, पत्नी, मुलगी, सासू या विविध रूपात वावरतांना जो त्याग, कष्ट ,बलिदान करत असते त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा खरंतर 8 मार्च हा दिवस. जो आपण ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करतो .
या दिनानिमित्त सौ सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात सकाळ व दुपार सत्रात कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. मा. प्राचार्य श्री. विश्वासराव साळुंखे यांनी दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व महिला शिक्षिकांचा विद्यालया मार्फत सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थिनींचे देखील चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. सौ. रेखा कसोदे. सौ.मीनल पाटील. सौ. मोहिनी चित्ते. सौ. ज्योती शेकोकार. सौ. किरण सुर्वे. सौ. अंजली पाटील. सौ. मंजूषा पाटील. यांनी लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, तीन पायांची स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यासारख्या स्पर्धा विद्यार्थिनी मार्फत राबवल्या. सर्व महिला शिक्षिकांनी देखील संगीत खुर्ची स्पर्धेत भाग घेतला. तसेच विद्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने साडी दिवस साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनींनी संपूर्ण दिवस उत्साहाने घालवला.
दिवसभरात पार पडलेल्या प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींची नावे जाहीर करण्यात येऊन त्यांना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले तर एका विद्यार्थिनीने गीत सादर केले. प्राचार्य मा. विश्वासराव साळुंखे यांनी महीलांचा गुणगौरव करत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . प्रा. सौ. रेखा कोसोदे यांनी आभार मानून समारोप केला. या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम यशस्वतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूंनी परिश्रम घेतले.