<
जळगाव – (प्रतिनिधी) – ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा होत असताना जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेची सत्ता येऊन पूर्ण एक वर्ष होत आले या एका वर्षात महापौर जयश्री महाजन यांनी एक क्रियाशील, कर्तुत्ववान महिला महापौरांचा मान मिळवला असून संपूर्ण शिवसेनेचे मनपा मध्ये बहुमत असल्याने व मागील वेळी शिवसेना ही अल्पमतात असल्याने अल्पसंख्यांक समाजाचे काही ठराव होऊ न शकल्याने जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन मानियार बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृत्वात महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या साठी साकडे घातले.
या सहाही मागण्या वर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याने त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून साकडे सोडण्यात आले.
मागण्या
१)भंगार बाजाराचा ठराव ९९ वर्षाचा झालेला आहे तो कायम करून ११२ कुटुंबीयांना रस्त्यावर आणू नका व त्यांना रोजगार उपलब्ध राहू द्या
२) अजिंठा चौका लगत असलेल्या मनपा प्रवेशद्वाराला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आझाद नाव त्वरित देण्यात यावे
३) अक्सा नगर ममता हॉस्पिटल जवळ प्रवेश द्वाराला श्रीमती मेहरुन्निसा गेट म्हणून मान्यता देण्यात यावी
४) जळगाव खान्देश चे स्वातंत्र्य सेनानी व खानदेश गांधी म्हणून नावाजलेले मीर शुक्रल्ला यांचे नाव जळगाव शहरातील उद्यानाला अथवा एखाद्या महत्त्वाच्या भागाला देऊन त्यांचे नाव जपण्यात
यावे.
६) मेहरून व जळगाव शहरातील मुख्य रस्ते व वस्त्यांमधील रस्ते तयार करन्यात यावे तसेच रस्त्यावर व वस्त्यांमधील अतिक्रमणे वाढत असल्याने ती त्वरित काढण्यात यावी व संपूर्ण जळगाव शहर व मेहरूण परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मनपाने विशेष मोहीम हाती घ्यावी
६) माहे रमजान पर्व सुरू होत असल्याने जळगाव शहरातील सुमारे ६० ते ६५ मशिदी जवळील लाईट लावून मिळावे व साफसफाई स्वच्छता करून मिळावी.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, ईदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह, हुसैनी सेना अध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, नुरी फाऊंडेशनचे नाजीम सुपडू शेख, लकी फाऊंडेशनचे सईद शेख ,मोहम्मद इमरान व खलील शेख, मरकज फाऊंडेशनचे रफिक शेख व पोलीस बॉईज क्लबचे समीर रईस यांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देतांना फारुक शेख सोबत डावीकडून रफिक शेख, खलील शेख, मुजाहिद खान, फिरोज शेख, नवीद पेंटर, मोहम्मद इमरान, अनिस शहा, सईद शेख आदि दिसत आहे