<
कांताई नेत्रालय येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कडू, अमर चौधरी, बी.डी. पाटील, विजय मोहरीर व इतर सहकारी
जळगांव 09 मार्च 22 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या 32 व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात 441 इतक्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हिल हॉस्पीटल जळगाव या संस्थांनी रक्ताचे संकलन केले.
स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंना अभिवादन व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प घेतला आहे. कंपनीतील सहकाऱ्यांनी रक्तदान करून रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताची गरज भागवून सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे 282, जैन फूडपार्क येथे 97, कांताई नेत्रायल येथे 04, जैन एनर्जीपार्क-43, जैन अॅग्रिपार्क व जैन डिव्हाईन पार्क – 15, – रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. असे एकूण 441 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले.
जैन प्लास्टिक पार्क डेमो हॉल येथे सकाळी 8 वाजता कंपनीचे जुने सहकारी विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते औपचारिक उद्घाटन झाले. येथे जैन प्लास्टिकपार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क आणि जैन फूडमॉल येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. कांताई नेत्रालय येथे जैन स्पोर्ट अकॅडमी, कांताई नेत्रालय, जैन शॉप व जैन गोडाऊन विभागातील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जैन फूडपार्क येथे जैन फूड पार्क, जैन अॅग्रीपार्क, जैन एनर्जीपार्क आणि जैन डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. याचे औपचारीक उद्घाटन सुवन शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जी. आर. पाटील, डॉ. संदीप पाटील, सुनिल गुप्ता, संजय पारख, टी .बी. पाटील, व्ही.पी. पाटील, किशोर बावीस्कर, प्रदीप सांखला, आर. डी. पाटील व जेठमल तापडिया आदि उपस्थित होते.
स्मृतिदिनानिमित्त अन्नदान
स्व. बाबा यांच्या स्मृतिदिनी सुमारे चौदाशेहून अधिक जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यात बालक आश्रम, हरिजन सेवक संघ मुलींचे वसतीगृह, गायत्री मंदीर, बाबा हरदास संघ आदी ठिकाणी भोजन पाठविले गेले त्याच प्रमाणे हेच मिष्टान्न स्नेहाच्या शिदोरी उपक्रमातील पाकीटातून वितरीत करण्यात आले.