<
डॉ. अफजल देवळेकर सरकार यांना महामहिम माननीय राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते “समाज रत्न” सम्मान राजभवन येथे सोमवारी, ०७ मार्च २०२२ रोजी पार पडलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
देवळेकर यांना राजकारण व समाजकारणाची आवड असल्याने ते सरकार एंटरप्राइजेस रिअल इस्टेट कन्सल्टन्सी व्याप सांभाळत २०११ साली राजकारण व समाजकारणात सक्रिय झाले, व शाहुवाडी पन्हाळा विधानसभा 2019 ची निवडणूक लढवली, तसेच पनवेल महानगरपालिका 2017 नगरसेवक पद लढवले ,या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना दिल्ली – भारत उपाध्यक्ष ,पोलिस टाईम्स न्यूज २४ चे संस्थापक/ संचालक / सहमुख्य संपादक, अबस्ट्रॅकट व्हिजन फिल्म प्रोडक्शनचे संचालक संस्थापक, देवळेकर सरकार युवा शक्ती शाहूवाडी पन्हाळाचे संचालक संस्थापक, सत्यमेव जयते संस्था संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, साई सिक्युरिटी को डायरेक्टर, मानवता फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया शिफरस जनरल वर्कर्स युनियन जनरल सेक्रेटरी, पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य सहसंचालक. अशा अनेक पदांच्या माध्यमातून सामाजिक राजकिय कार्य केले आहे. व अनेक आंदोलनात सहभागी होऊन गोरगरिबांना न्याय मिळवून दिला, अनाथ आश्रमण्णा निधी, दिव्यांगना व्हीलचेअर अनेक लोक लोकांच हॉस्पिटल ची बिले कमी करून देणे, बेघर लोकांना घरे ही मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कोरोना कालखंडामध्ये अनेक पेशंट हॉस्पिटल मिळवून देणे, पेशंटच्या नातेवाईकांना अन्न पाण्याची सोय करून देणे.
त्याकरीता त्यांना ऑल इंडिया,जरनॅलिस्ट क्रिडा युवारत्न पुरस्कार २०१२,आण्णाभाऊ साठे युवा समाजरत्न पुरस्कार २०१३,समता स्वराज पुरस्कार २०१४,मुंबई काँग्रेस आदर्श समाजरत्न पुरस्कार,शाहूवाडी पन्हाळा युवा उद्योजक पुरस्कार २०१३,विकास गंगा समाजरत्न पुरस्कार २०१५,जनमत न्यूजपेपर समाजरत्न पुरस्कार २०१९ ,ABRK फिल्म अवर्ड 2021 , पोलिस टाईम्स न्यूज 24 कोरोना युद्ध 2021, व दिल्ली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीची सोशल वर्क डॉक्टरेट पदवी असे अनेक पुरस्कार व पद देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना महामहिम माननीय राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते समितीचा “समाज रत्न पुरस्कार” सम्मान राजभवन येथे सोमवारी, ०७ मार्च २०२२ रोजी पार पडलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.