<
भडगाव – महीला व मुली आज जगात कोणत्याही विषयावर बोलू शकतात,यशस्वी होतात खगोल विज्ञान,खेळ,क्रीडा संरक्षण प्रशासन, अर्थशास्त्र व्यापार, साहित्य,राज व समाजकारण असे कोणतेही क्षेत्र रोखू शकत नाही,सैनिकी विभागातही महीला आज कर्तृत्व सिद्ध करीत आहेत” असे प्रतिपादन प्रतिभा कोळी सचिव संस्कृती फाऊंडेशन भडगाव यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त ” एक नारी क्षेष्ठ नारी”या विषयावर बोलत होते, कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पाटील तर अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश कोळी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व महिलांनी प्रतिमेचे पूजन केले.
आज संस्कृती फौंडेशन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, भडगाव येथे क्लासच्या सर्व विद्यार्थिनी व महिला पालक यांच्याद्वारे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी
प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, प्रथम महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन प्रथम IAS अण्णा राजन मल्होत्रा अशी अनेक भारतीय यशस्वी महिलांची नावे घेतांना आपली यादी अपूर्णच राहते भारतीय नारीस आपले कर्तृत्व दाखवण्या साठी पुरुषी मानसिक तेत बदल करून तिला सामाजिक व भावनिक सहकार्याची आज गरज आहे, असे म्हणाल्या यावेळी
सर्व महिला पालकांचा सम्मान करण्यात आला व त्यानंतर उपस्थित सर्व महिलांसाठी प्रश्न मंजुषा आयोजित आली होती. त्यात प्रथम तीन स्थान प्राप्त करणाऱ्या पालक महिलांना विशेष बक्षीस व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थ्यांनिंची मनोगते व पालकांची मनोगते झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पाटीलने केले प्रास्ताविक विद्या वाघ, स्वागत प्रियंका महिरे, आभारप्रदर्शन अश्विनी भिल्ल हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संस्कृती फौंडेशनचे संचालक श्री.डी. बी.कोळी, पल्लवी सोनवणे, निशा सोनवणे, शुभांगी पाटील यांनी सहकार्य केले.