<
भडगाव : प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील वडजी येथिल टि.आर.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी बोर्ड परिक्षा २०२२ संदर्भात मार्गदर्शक सुचना , विचारविनिमय याविषयी सह विचार सभा घेण्यात आली .सभेच्या अध्यक्षस्थानी वडजी विदयालयाचे मुख्याध्यापक ए .एस. पाटील हे होते.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिपक बोरसे , महिंदळे विदयालयाचे मुख्याध्यापक अरुण बागुल , पळासखेडे विदयालयाचे मुख्याध्यापक अभिजीत शिसोदे , मुख्याध्यापक ए .एस. पाटील यांनी दहावी परिक्षा कशी सुरळीतपणे पार पडेल . याविषयी मार्गदर्शन केले.
परिक्षा सुपरवायझर , रनर , केंद्राध्यक्ष , लिपीक , शिपाई , वॉटरबॉय यांची भूमिका तसेच परिक्षा कालावधीत वेळचे बंधन पाळणे किती महत्वाचे आहे , उत्तरपत्रिकेवरिल बारकोड स्टिकर , परिक्षार्थी आणि सुपरवायझर यांची सही या विषयी अतिशय महत्वाच्या सुचना या विषयी सविस्तर माहिती दिली गेली .
या सभेचे सुत्रसंचालन राकेश पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन वाय .ए.पाटील सर यांनी केले . यावेळी पळासखेडे , महिंदळे , पिचर्डे येथिल विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते .
सहविचार सभा यशस्विततेसाठी वडजी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए .एस. पाटील यांचे सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले .