<
यावल-(प्रतिनिधी) – आज दिनांक १४-मार्च २०२२ वार सोमवार रोजी विकास सोसायटी, ग्रामपंचायत जवळ बामणोद तालुका यावल येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले .सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपेरेशन साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना केले गेले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले गेले . डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १४५ नेत्र रुग्णांची तपासणी व १८ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले.
सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली. या वेळी डॉ कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन सल्ला दिला *संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा डॉ.कुंदन दादा फेगडे यांचे उद्दिष्ट या वेळी डॉ.कुंदन फेगडे यांनी रुंग बांधवांना मार्गदर्शन केले व व आता पर्यंत १९ शिबीर हे आमच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने यावल तालुक्यात घेण्यात आले.
यावेळी डॉ फेगडे म्हणाले कि माझ्या व माझ्या मित्रपरिवार च्या सहकार्यातून वृद्ध सेवा होत आहे हे मी माझे भाग्य समजतो व यानंतर हि संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने मी व माझा संपूर्ण मित्र परिवार कार्य, सेवा करत राहतील अशी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.नरेंद्र कोल्हे होते, तर कार्यक्रमाचे उद्धघाटन श्री. सखाराम आण्णा चौधरी (म्हैसवाडी ) यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले या वेळी डॉ.कुंदन फेगडे,डॉ.नरेंद्र कोल्हे, राहुल तायडे (सरपंच ), तुषार जावळे ( उपसरपंच ), प्रमोद बोरोले (विकास सोसायटी चेअरमन )प्रल्हाद केदारे (माजी उपसरपंच )पुरुषोत्तम भोळे, देविदास तळेले गिरीश तळेले देविदास फेगडे,किसन चौधरी, पवन महाजन, कोमल तळेले प्रशांत भंगाळे खेमचंद नेमाडे , मयूर कोल्हे आरोग्य सेविका सौ. रेखा चौधरी, आशा वर्कर गट प्रमुख सौ अर्चना सोनवणे, सौ. निलिमा धांडे आशा वर्कर निलीमा भंगाळे, सौ विमलताई, सौ रेखा झांबरे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला डॉ.कुंदन फेगडे यांचे संपर्कप्रमुख सागर लोहार, मनोज बारी , विशाल बारी, हर्षवर्धन मोरे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.