<
भाग्यश्री पाटील चे रेल्वे स्थानकावर स्वागत करताना फारुक शेख सोबत विवेक आळवणी, रवींद्र धर्माधिकारी व संजय पाटील आदी दिसत आहे
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटने तर्फे महाराष्ट्रात व राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पाचोरा एम एम कॉलेजची विद्यार्थिनी तसेच जैन स्पोर्टस अकडमी ची खेळाडू भाग्यश्री प्रवीण पाटील हीने गुरगाव येथे ९ ते १३ मार्च पर्यंत झालेल्या २० वर्षातील जूनियर ३५ वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत साडेसात गुणांसह द्वितीय क्रमांक पटकाविला व ७२ हजार रुपयाचे रोख पारितोषिक सह भारत सरकार तर्फे सहा फॉरेन टूर व पाच ग्रॅंडमास्टर चे कॅम्प साठी तिची भारत सरकार तर्फे निवड करण्यात आली आहे
जळगाव रेल्वे स्टेशन वर जल्लोषात स्वागत
सोमवार १४ मार्च रोजी दुपारी दीड वाजता दिल्लीवरून रेल्वेने भाग्यश्री चे जळगावी आगमन होताच तिचे स्वागत जल्लोषाने व फटाके फोडून करण्यात आले.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार तथा जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन पेढ़े भरून स्वागत केले.
यावेळी जिल्हा संघटनेचे तथा जैन स्पोर्टस अकडमी चे रवींद्र धर्माधिकारी, संघटनेचे व अनुभूतीचे क्रीडाशिक्षक संजय पाटील ,टेबल टेनिस संघटनेचे सचिव विवेक आडवाणी यांची खास उपस्थिती होती.
भाग्यश्री ने जळगाव चे नाव अजरामर केले
भाग्यश्री पाटील हीने वयाच्या ७व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता तर वयाच्या १० वर्षावरील आतील जागतिक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता. तसेच १५ वर्षाच्या आतील गटात २०१९ ला राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. आज भाग्यश्री १६ वर्षांची असताना सुद्धा २० वर्षाच्या वयोगटात तिने साडेसात गुणांसह दुसरा क्रमांक पटकाविला या स्पर्धेत प्रथम आलेली प्रियांका नोटोकी, आंध्र प्रदेश हिने सुद्धा साडेसात गुण मिळविले तर तृतीय क्रमांकावर तामिळनाडूची फॅमिली
चलादुरण हिने सात गुण प्राप्त केलेले आहे.
भाग्यश्री व प्रियंकाचे जरी साडेसात समान गुण असले तरी बुक हॉलच्या नियमानुसार प्रियंकाला प्रथम पारितोषिक देण्यात आले.