<
भडगाव – येथील सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय भडगावच्यां राष्ट्रीय सेवा योजना एककाचे दत्तक गाव वडगाव सतीचे येथे दिनांक १० मार्चला बी.एस. एफ. त्रिपुराचा जवान श्री.अजित बारकु पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भडगाव पंचायत समितीच्या सभापती डॉ.सौ.अर्चना विशाल पाटील होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी अण्णासाहेब नानासाहेब देशमुख होते व्यासपीठावर वडगावचे उप सरपंच सौ.सविता समाधान पाटील,रामलाल काशिराम माळी,प्रकाश नवल पाटील,योगेश धर्मराज पाटील,दीपक रतन माळी,दीपक महारू पाटील हिलाल गोविंदा बाविस्कर, प्रकाश लोटन महाजन,कैलाश धुडकु वाघ,दिनकर पाटील अंबरसिंग नरसिंग पाटील,पदमसिंग चींधू पाटील धनसिंग गनसिंग पाटील, माजी मुख्याध्यापक एस.के.राठी मुख्याध्यापक पी.एल.पाटील संदीप कोमलसिंग पाटील समाधान लुभानसिंग पाटील रामदास गणपतराव हौसरे शिक्षक हजर होते.
कार्यक्रमाच्यां प्रारंभी सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी अर्चना पाटील म्हणाल्या की मेहनत व प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली आहे सतत काम करत असताना अडचणीवर मात करीत मार्ग क्रमण करीत राहा शिका,श्रवण करा व गुरुजनाचे मार्गदर्शन तुम्हाला शिदोरी असते. कार्य क्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालया चे प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा.गुणवंत साहेबराव अहिरराव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा सुरेश कोळी यांनी मानले.यावेळी कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. संजय भैसे , विदयार्थी कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ्. दिपक मराठे, राष्ट्रीय सेवा योजना महिला सहायक कार्यक्रमअधिकारी प्रा.रचना गजभिये, प्रा.सचिन हडोळतिकर, प्रा.गजानन चौधरी,राजू मराठे,दिलीप तडवी, तुळशीराम महाजन,मनोहर महाजन व वडगावकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.