<
नाशिक : ‘अतिशय विषम परिस्थितीतदेखील येणाऱ्या संकटांचा धीरोदात्तपणे सामना करणारी स्त्री ही नियंत्याने दिलेली अद्भुत देणगी आहे. तिचा यथोचित मान ठेवून समाजातील तिचे स्थान आणखी बळकट केले पाहिजे ‘,असे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी , नाशिक शाखा आणि सुप्रेम मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित सुप्रेम रेडक्रॉस महिला गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नाशिक रेड क्रॉस चे सचिव मेजर पी.एम. भगत होते. व्यासपीठावर सुप्रेम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत भुतडा , प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. सुषमा भुतडा, डॉ. प्रतिभा औंधकर, प्रतिभा भगत, शशिकांत जाधव, डॉ.नितिन बिर्ला उपस्थित होते.
सोहळ्यात उद्योजिका डॉ.विजया पाटील, डॉ. राजश्री पाटील (वैद्यकीय), डॉ. विजयालक्ष्मी मणेरीकर ( सांस्कृतिक), कुंदा बच्छाव (शैक्षणिक), सारिका गुजराथी (पत्रकारिता), माया मुक्ताई ( सामाजिक), दीपाली खन्ना (प्रशासकीय ), डॉ. दीप्ती वाधवा देवरे ( पॅरामेडिकल), मिताली गायकवाड (क्रीडा), गो ग्रीन कॅब्ज (महिला संस्था ) यांना सुप्रेम रेडक्रॉस गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर रेडक्रॉस कर्मचारी मंगल रत्नाकर, मंगला कस्तुरे, जयश्री कुलथे, प्रमिला शेजवळ यांचा रेड क्रॉस मधील प्रदीर्घ सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. गौरव मूर्तींचा परिचय डॉ सुचेता गंधे, डॉ. सुनंदा भोकरे, डॉ.प्रीती त्रिवेदी, राधा सिंग, वैशाली शहा, विभा धूत, यशस्वी मुथा, शशिकांत जाधव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुनील औंधकर यांनी केले, तर डॉ. प्रतिभा औंधकर यांनी आभार मानले. डॉ.सुचेता गंधे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रम यशस्वितेसाठी चंद्रकांत गोसावी प्रयत्नशील होते.
छायाचित्र : सुप्रेम – रेडक्रॉस महिला गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी लीना बनसोड तसेच मेजर पी. एम. भगत, डॉ प्रशांत भुतडा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. सुषमा भुतडा , डॉ प्रतिभा औंधकर, डॉ सुनील औंधकर, प्रतिभा भगत यांचे समवेत पुरस्कार विजेते दिसत आहेत