<
भडगाव,- प्रत्येकाने वस्तू व सेवांच्या आपूर्तीसाठी मोबदला देताना त्यातून अपेक्षित असलेले फळ मिळवताना सुष्म पडताळणी करणे आवश्यक आहे कोणतीही वस्तू घेताना त्या वस्तूचा दर्जा ,किंमत,उत्पादन दिनांक,त्या वस्तू मधील घटक यांची माहिती घ्यावी.तसेच वस्तूंच्या सुरक्षा, कायदा, ट्रेडमार्क याबदल तडजोड करू नये कारण आपण योग्य पद्धतीद्वारे उपभोग घेता येईल म्हणून जागरुकता हाच मूलमंत्र होय असे विचार प्रा.सुरेश कोळी ग्राहक कल्याण फाऊंडेशन यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.प्र.से.अधिकारी नेहा भोसले तहसील दार भडगाव यां होत्या .यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार रमेश देवकर, मोतिराय,भालेराव,दक्षता समितीचे सदस्य योजना पाटील,इम्रान सय्यद हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.यावेळी सुरेंद्र मोरे,इम्रान सय्यद , मोतिराय यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवकर साहेबांनी तर सूत्रसचालन श्री.दशरथ बी.कोळी यांनी केले तर आभार पुरवठा अधिकारी एस.एल गढरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. डी.सोनवणे, पी.एस.मोरे, सागर पाटील यांनी प्रयत्न केले यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.