<
भडगाव – कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयच्या दत्तक वडगाव सतीचे येथे सदिच्छा भेट दिली.
आदरणीय सर यांनी एकूण परिस्थितीची पाहणी केली व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतेवेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्ही या सात दिवसीय शिबिरापासून ते आव्हान शिबिर ,राष्ट्रीय एकात्मता शिबीर अश्या वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करून घ्यावे जेणे करून आपल्या विद्यापीठाला राष्ट्रीय इंदिरा गांधी अवॉर्ड मिळेल यासाठी तुमचे प्रयत्न महत्वाचे आहेत असे मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी व्यक्त केले व समाधान व्यक्त केले. प्रसंगी जळगाव जिल्हयाचे विभागीय समन्वयक डॉ. नितीन रामदास बडगुजर सर तसेच रावेर विभागाचे विभागीय समन्वयक डॉ.आशितोष रमाकांत वर्डीकर सर हजर होते संध्याकाळी भेट दिली कार्यक्रम यशस्वीते साठी
प्रा.गुणवंत अहिरराव कार्यक्रम अधिकारी, प्रा सुरेश कोळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,राजू मराठे,दिलीप तडवी, मनोहर महाजन व एनएसएस स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.