Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तसेच माजीमंत्री गिरीषभाऊ महाजन- आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तसेच माजीमंत्री गिरीषभाऊ महाजन- आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित भूसंपादन प्रस्तावांसाठी अर्थसंकल्पात २५० कोटींची तरतूद


जळगाव – गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा – मुंदखेडे, चितेगाव, ओढरे, कोदगाव प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना न्यायालयाने निकाल देऊन व शेतकऱ्यांनी महामंडळाशी तडजोडी करूनदेखील आपल्या हक्काच्या संपादित जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने यासाठी सदर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी पातोंडा येथील भाजपा पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील यांच्यासह २०० हून अधिक शेतकऱ्यांनी जळगाव येथे आमरण उपोषण सुरु केले होते.  त्यावेळी माजी जलसंपदामंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी उपोषणास भेट देऊन शेतकऱ्यांचे थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलणे करून दिले होते. आमदार गिरीषभाऊ व शेतकऱ्यांनी त्यावेळी आक्रमक भूमिका घेतल्याने जलसंपदामंत्री यांनी मुंबई येथे बैठक बोलावण्याचे आश्वस्त केले होते.

तद्नंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी माजीमंत्री गिरीषभाऊ महाजन सुचनेने मुंबई येथे मंत्रालयात चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा मुंदखेडे, चितेगाव, ओढरे, कोदगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत आमदार गिरीषभाऊ महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्रमकपणे शेतकऱ्यांची बाजू लावून धरत ज्या शेतकऱ्यांनी शासनाशी तडजोड करत कोट्यावधी रुपयांच्या व्याजावर पाणी सोडले मात्र त्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार आल्यापासून १ रुपयाही दिला गेला नसल्याने या बैठकीत ठोस निर्णय घेण्याचा आग्रह धरला, त्यावेळी जलसंपदा मंत्री यांनी येत्या अधिवेशनात सदर प्रलंबित भूसंपादन प्रस्तावांसाठी २०० कोटींहून अधिक निधी देण्याचे आश्वासन दिले होते व तसा प्रस्ताव जलसंपदा विभागाने अर्थ विभागाला पाठविण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापी महामंडळ क्षेत्रातील प्रलंबित न्यायालयीन भूसंपादन प्रकरणे यासाठी २५० कोटींची ठोक तरतूद केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष व आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीषभाऊ महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात गिरीषभाऊ महाजन जलसंपदा मंत्री असताना गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित भूसंपादन निधीचा प्रश्न मार्गी लागून यशस्वी तडजोड झाली होती व त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना पहिला हप्ता देखील प्राप्त झाला होता, मात्र तद्नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना न्यायालयाने आदेश देऊनदेखील गेल्या २ वर्षात एक रुपयाही मिळाला नव्हता. आता मात्र सततच्या पाठपुराव्याने २५० कोटींची तरतूद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार गिरीषभाऊ महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या शिबिरास डॉ सचिन नांद्रे सरांची सदिच्छा भेट

Next Post

महिला दिनानिमित्त तिरुमाला कंपनी कडुन “फॅशन शो” संपन्न

Next Post
महिला दिनानिमित्त तिरुमाला कंपनी कडुन “फॅशन शो” संपन्न

महिला दिनानिमित्त तिरुमाला कंपनी कडुन "फॅशन शो" संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo