<
धरणगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अपंग महासंघातर्फे प्रधानमंञी आवास योजनेत प्राधान्याने सहभागी करा यासह इतर मागण्यांसाठी तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयव नगरपालीकेत अपंग बाधवांनी निदर्शने करुन निवेदन दिले.राष्ट्रीय अपंग महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांचे प्रतिनिधी, बीडीओ एस.बी.कुडचे ,नगरपालीकेत प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे यांच्या कार्यालयात निदर्शने करीन निवेदन देण्यात आले.याप्रसंगी अपंग संघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील , तालुका प्रसिद्धी प्रमुख असलम मनियार , लिलाधर पाटील ,महिला अध्यक्ष लताबाई पाटील व सर्व अपंग बाधव उपस्थित होते.यावे अधिकाय्रांना दिलेल्या निवेदनात अपंगांना प्रधानमंञी आवास योजनेचा लाभ द्या, अपंगासाठी ५ टक्के निधी खर्च करावा , अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा अश्या अनेक मागण्यांचा समावेश असून या संदर्भात सर्व अधिकाय्रांनी आश्वासन दिले.