Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वर्तमान स्थितीत गांधी विचारांची अपरिहार्यता : दलुभाऊ जैन;गांधीतीर्थच्या दशकपूर्ती सोहोळ्यात २४ सहकाऱ्यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वर्तमान स्थितीत गांधी विचारांची अपरिहार्यता : दलुभाऊ जैन;गांधीतीर्थच्या दशकपूर्ती सोहोळ्यात २४ सहकाऱ्यांचा सन्मान

दशकपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित दलुभाऊ जैन,  उमविचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जैन इरिगेशनचे अध्यक्ष  अशोकभाऊ जैन, सौ. ज्योति अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन आयंगार, उदय महाजन, प्रो.गीता धरपाल. डॉ. अश्विन झाला, गिरीश कुळकर्णी व इतर मान्यवरांसोबत गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी गण.


जळगाव,दि. २५, (प्रतिनिधी) – मानवनिर्मित संकटांना सामोरे जाण्याची क्षमता गांधी विचारांमध्येच आहे. वर्तमान परिस्थितीत गांधी विचारांची अपरिहार्यता असून मोठ्या भाऊंनी दूरदृष्टीने या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठीच गांधीतीर्थची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक दलूभाऊ जैन यांनी केले. गांधीतीर्थच्या दशकपूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या २४ सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोकभाऊ जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार, संचालिका ज्योतिभाभी जैन, सल्लागार डॉ. के. बी. पाटील, गांधी संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल व जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चे संचालक अथांग जैन यांची विशेष उपस्थिती होती.


आपल्या मनोगतात दलूभाऊ पुढे म्हणाले कि, गांधीजींच्या सत्य व अहिंसेचा पुरस्कार करीत व्यवसायातील साधनशुचिता सांभाळत मोठ्या भाऊंनी आपल्या जीवनाचा उत्तरार्ध व्यतीत केला. गांधीतीर्थ म्हणजे माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात सामाजिक सद्भावापोटी निर्माण झालेले अक्षरलेणे आहे, असे मोठे भाऊ म्हणत असत. गांधी विचारांचे त्यांचे स्वप्न आज गांधीतीर्थमुळे प्रत्यक्षात साकारलेले आहे. आपण सर्व या संस्थेच्या वाटचालीतील प्रमुख घटक आहात आणि आम्हास त्याचा सार्थ अभिमान आहे. डॉ. के. बी. पाटील यांनी गांधीतीर्थच्या वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला व जैन परिवाराच्या कार्यसंस्कृतीमुळेच हे अद्भुत कार्य शक्य झाले असे गौरवोद्गार काढले. अशोकभाऊ जैन यांनी कोरोना पश्चातच्या कालखंडात आपण अधिक जोमाने कार्य करीत मोठ्या भाऊंचे स्वप्न साकारण्यासाठी कटिबद्ध होऊ या असे आवाहन केले. अथांग जैन यांनी समयोचित भाषण केले. प्रमोद जैन, निलेश पाटील, अनिलेश जगदाळे, तुषार बुंदे, विश्वजित पाटील, संतोष भिंताडे, प्रदीप मराठे, डॉ. अश्विन झाला, चंद्रशेखर पाटील, सुधीर पाटील, निवृत्ती वाघ, श्रीराम खलसे, नामदेव धनगर, अमोल भोलाणकर, राजेंद्र माळी, दगडू पाटील, निलेश कोल्हे, सुभाष भंगाळे, अमोल पाटील, सविता महाकाळ, दुर्वास नलगे, सुरेश पाटील, अशोक चौधरी व उदय महाजन या सहकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश कुळकर्णी यांनी केले. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोऱ्यात होली मिलन निमित्त संगीत संध्येचा जल्लोष

Next Post

वडजी विदयालयात शाळापूर्व तयारी प्रशिक्षण संपन्न

Next Post
वडजी विदयालयात शाळापूर्व तयारी प्रशिक्षण संपन्न

वडजी विदयालयात शाळापूर्व तयारी प्रशिक्षण संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo