<
भडगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडजी येथिल टी.आर. पाटील विद्यालयात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव आणि शिक्षण विभाग पंचायत समिती भडगाव यांच्या वतीने शाळापूर्व तयारी अभियान केंद्र स्तर प्रशिक्षण मोठया उत्साहात साजरे करण्यात आले .
हे प्रशिक्षण २५ मार्च रोजी ११ ते ५ या वेळेत घेण्यात आले . प्रशिक्षणात वडजी केंद्रातीत जि .प .केंद्र शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांचा सहभाग होता . प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी वडजी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए .एस. पाटील हे होते .
सुरुवातीला प्रतिमापूजन करुन प्रक्षिक्षण सुरु झाले . ईशस्तवन आणि स्वागतगीत महिला शिक्षिकांनी म्हंटले . यावेळी वडजी केंद्राचे कार्यक्षम , कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख संजय नाहिदे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले कि , शाळा पूर्व तयारी अभियान हे प्रशिक्षण खरोखर अत्यंत महत्वपूर्ण आहे . आणि त्यात अंगणवाडी सेविकांचा सहभाग हि बाब खरच उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण आहे . कारण शालेय शिक्षणाचा पाया हा खरा अंगणवाडी पासूनच सुरु होतो . हाच पाया पक्का व्हावा हि महत्वाची बाब आहे . त्यासाठी हे प्रक्षिक्षण देणे गरजेचे आहे . शाळेत दाखल होणारे बालक आणि त्याची माता यांची भूमिका , प्रशिक्षणाचा उद्देश कसा सफल होईल यविषयी सगळ्यांनी सकारात्मक प्रयत्न करावे .यावेळी वडजी विदयालयाचे मुख्याध्यापक ए .एस .पाटील यांनी शाळापूर्व प्रशिक्षणाविषयी माहिती दिली . बालवयापासून शिक्षण प्रणाली चांगल्या प्रकारे राबविली जाणे , आणि त्यातून सगळीच मुले शिक्षणाच्या प्रवाहात कशी येतील याविषयी आपले विचार मांडले . सदर प्रशिक्षणाचे सुलभक म्हणून तज्ञ मार्गदर्शक सुभाष उगले आणि सुरेश भिल यांनी आपली भूमिका पार पाडली .
सुलभक सुभाष उगले यांनी प्रशिक्षण विषयी खूप अनमोल माहिती सांगितली . त्यांनी सांगितले कि गेल्या दोन वर्षापासून कोविड १९ मुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्यामुळे अध्ययन क्षती लक्षात घेता जून २०२२ ला इयत्ता १ ली त दाखल होणाऱ्या बालकाची पूर्वतयारी करुन घेणे हा प्रशिक्षणाचा हेतू आहे . साधारणपणे १ एप्रिल ते १५ जून अडीच महिने हे अभियान राबविले जाणार आहे . अभियाना अंतर्गत अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे . केंद्रस्तरावर एक मेळावा घेऊन ७ स्टॉल उभारले जातील . मातांना आयडीया कार्ड दिले जाईल .आणि प्रत्येक दाखल होणाऱ्या मुलांना कृतिपत्रिका व मुलांचे शाळेतील पहिले पाऊल हे पुस्तक दिले जाईल. या प्रक्षिक्षणामुळे नक्कीच चांगला हेतू साध्य होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले . प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष उगले सर यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश भिल सर यांनी केले .
यावेळी वडजी केंद्रातील व विदयालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी , अंगणवाडी सेविका हजर होते . सगळ्यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. केंद्रप्रमुख संजय नाहिदे यांच्या सुत्रबध्द नियोजनामुळे संपूर्ण तालुक्यात एक आगळेवेगळे , एक आदर्श प्रशिक्षण घडवून आणले गेले .