<
नवी दिल्ली – विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी पात्र होण्यसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) परीक्षा (डिसेंबर- २०१९) या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय पात्रता चाचणी (युजीसी-नेट) परीक्षा- २०१९
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५५% गुणांसह मास्टर पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केली असावी. (अनुसूचित जाती-जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग उमेदवारांसाठी किमान ५०% गुण आवश्यक.)
वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग/ लिंगपरीवर्धक उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत तसेच सहायक प्राध्यापक असलेल्या उमेदवारांना वयाची अट नाही.)
परीक्षा फीस – अमागास उमेद्वारांना १०००/- रुपये, आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांना ५००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवारांना २५०/- रुपये आहे.
प्रवेशपत्र – दिनांक ९ नोव्हेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील.
परीक्षा – दिनांक २ ते ६ डिसेंबर २०१९ दरम्यान घेण्यात येईल.
निकाल – दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ आहे.