सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाची संयुक्त औद्योगिक सहल नुकतीच पार पडली. भडगाव येथील ‘मास्टरलाईन इंजिन ऑईल कंपनी’ या ठिकाणी ही भेट संपन्न झाली. या औद्योगिक सहलीप्रसंगी मास्टरलाईन ऑईल कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर हेमंत महाजन यांनी प्रोसेसिंग, पॅकिंग, सेलिंग, वितरण, अकाउंटिंग इत्यादीविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कंपनीच्या संपूर्ण कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली.
त्याचबरोबर कंपनीचे संचालक सुयोग जैन यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी मास्टरलाईन फाऊंडेशनच्या स्थापनेपासून कंपनीविषयी माहिती दिली. वाणिज्य व अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रामध्ये अनेक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले. या संधींचा विद्यार्थ्यांनी यथोचित लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. या प्रसंगी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर, प्रा. एस.ए. कोळी, डॉ. गजानन चौधरी, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. जनार्दन देवरे उपस्थित होते. वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या औद्योगिक सहलीचा लाभ घेतला वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. सचिन हडोळतीकर यांनी मास्टरलाईन ऑईल कंपनीविषयी आभार व्यक्त केले.