धुळे – (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील रा. नेवाडे ता. शिंदखेडा येथील रहिवासी असुन यांचे वडील शेती करतात.
आई वडील दोन्ही नेवाडे येथे शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सुवर्णा ही त्यांची मोठी कन्या असून अजून दोन मुली आहेत.
शिक्षण करत असतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, असे असतांना देखील आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन खचून न जाता मुलीचे शिक्षण केले.
सुवर्णाचे शिक्षण मु.जे. महाविद्यालय जळगाव येथे झाले आहे. एम. एस्सी. गणित विषयातुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
पदवी शिक्षण सुरू असतांना जळगाव येथे असतांना त्यांनी MPSC चा अभ्यास सुरू केला होता, कोणताही प्रकारचा क्लास न लावता त्यांनी एम.पी.एस.सी 2019 या परीक्षेत यश मिळवुन विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कोविड-१९ च्या काळात लाॅकडाऊन लागल्याने सर्व मुलं मुली गावी निघूल गेले असल्याने त्यांनी लाॅकडाऊन कालावधीत मुख्य परीक्षेचा व ग्राऊंडसाठी शिवाजी महाराज स्टेडियम येथे ग्राऊंड सुरू केले या कालावधीत सुवर्णा बाळू पाटील यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, यानंतर त्यांनी नाशिक येथे स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर कोच वैभव झरोवर यांचे ग्राऊंड जॉईन केले, व काहीच दिवसात त्यांनी ग्राऊंड क्लिअर करून, लेखी परीक्षा देऊन PSI पदी यश प्राप्त केले. राज्यातून ओबीसी संवर्गातुन 21 व्या क्रमांकाने कु.सुवर्णा बाळू पाटील PSI पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल गावकऱ्यांसह नातेवाईक व मित्र परिवारातुन अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. व पुढील वाटचालीसाठी देखील मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.