<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथे दिनांक 03/04/2022 रोजी आय एम ए हॉल जळगाव येथे महाराष्ट्र आय एम ए अध्यक्ष डॉक्टर सुहास पिंगळे सचिव डॉक्टर मंगेश पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेस डॉक्टर उल्हास पाटील डॉक्टर अनिल पाटील जळगाव आय एम अध्यक्ष डॉक्टर दीपक आठवले उपाध्यक्ष डॉक्टर सुनील नहाटा सेक्रेटरी डॉ.जितेंद्र कोल्हे डॅा.स्नेहल फेगडे डॉ.धर्मेंद्र पाटील डॉ.राधेश्याम चौधरी डॉ.राजेश पाटील जनसंपर्क अधिकारी डॉ.विनोद जैन डॉ.सि. जी. चौधरी ,डॅा विलास भोळे व आय एम ए मेंबर्स उपस्थित होते.
सदर पत्रकार परिषद राजस्थान येथील डॉक्टर अर्चना शर्मा या स्त्री रोग तज्ञ वरील झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी घेण्यात आली. त्यात स्थानिक डॉक्टर अर्चना शर्मा यांची काहीएक चूक नसतांना प्रशासन व स्थानिक राजकीय लोकांच्या दबावामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली आहे. त्यासाठी आय एम ए संघटनेने त्या हत्तेस प्रवृत्त केलेल्या लोकांना त्वरित अटक होऊन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व पुढे अशी घटना घडू नये यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा अशी मागणी केलेली आहे.
तसेच आय एम ए संघटनेने दिवंगत डॉक्टर अर्चना शर्मा यांच्या पिडीत कुटुंबाला पुरेशी भरपाई देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.