यावल – (प्रतिनिधी) – तालुक्यातील भालोद येथे दि.३/४/२०२२ रोजी नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले ग्रामस्थांनी ह्या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद दिला शिबिरात दरम्यान
जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, जळगाव जिल्हा. बँकेचे अध्यक्ष श्री. गुलाबरावजी देवकर (अप्पासाहेब ), शिबिराचे आयोजक सौ. सुचित्रा महाजन, नेत्र चिकित्सक जयेश वाल्हे, डॉ. विजय सरताळे आणि भालोद गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.