पाचोरा कृष्णापुरी वि.का.सोसा.तील सर्व १३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी
पाचोरा – (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या कृष्णापुरी विकास सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आजी-माजी आमदारांच्या परिवर्तन पॅनल चा पुरता धुव्वा उडाला असून भाजपप्रणीत अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला सर्वच्या सर्व जागा जिंकून घवघवीत यश मिळाले.
प्रथमच पाचोरा तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. यामुळे पाचोरा तालुक्यातील राजकारणाला दिशा मिळाली आहे .गेल्या २२ वर्षांपासून कृष्णापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वर सतीश परशराम शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व असून त्यांचा पारदर्शी व निष्कलांकित कारभारास शेतकरी सभासदांनी स्वीकारले असून एके काळचे कट्टर विरोधक असलेले विद्यमान आमदार किशोर पाटील व माजी आमदार राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांच्या मनोमिलनातून परिवर्तन पॅनल तयार केले व महाविकास आघाडीचा हा पहिलाच प्रयोग अयशस्वी ठरला अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनल ला घवघवीत यश मिळाले असून सर्वच्या सर्व १३ जागांवर शेतकरी पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत ८२६ सभासद असलेल्या या कृष्णापुरी सोसायटीत सुमारे अडीच कोटीचे ठेवी असून शंभर टक्के वसुली व नफ्यातील संस्था म्हणून सतीश शिंदे यांनी २२ वर्षापासून कारभार हाताळला आहे त्याचे फलित म्हणून शेतकऱ्यांनी कृष्णापुरी सोसायटीवर पुनश्च सतीश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी पॅनल ला घवघवीत यश दिले आहे. आज दि 3 रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी तात्काळ मतमोजणी करण्यात आली निकाल घोषित झाला यावेळी अमोल शिंदे व सतीश शिंदे यांच्यासह विजयी उमेदवारांनी ढोल ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला ही निवडणूक म्हणजे पाचोरा नगरपालिकेची रंगीत तालीम असल्याचे शहरात चर्चिले जात होते.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले की कृष्णापुरी विकास सोसायटीत २२ वर्षापासून सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या आत्मविश्वासाने शेतकरी हित जोपासत संस्था अबाधित ठेवली असून निष्कलंकीत निस्वार्थ भावनेने सोसायटीचा कारभार चालू ठेवला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्णपणे विश्वास ठेवून विजय मिळवून दिला.तसेच आजी-माजी आमदारांनी पूर्णपणे प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र शेतकऱ्यांनी महा विकास आघाडी ला नाकारले आहे.