<
भडगाव- गोरगरीब,वंचीत,मुस्लिम अनाथासाठी शिक्षणाची गंगा ज्योतिबा फुलेंनी स्व: कर्तुत्वाने व विचारांतून निर्माण केलीचांगल्या कार्याची सुरुवात घरातून केली पाहिजे,तन मन,धनाने सर्वस्व अर्पण करणारे ज्योतिबा शिक्षण महर्षी होय,असे विचार प्रा. डॉ. चित्रा पाटील, इतिहास विभाग यांनी व्यक्त केले ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समंनवयक प्रा. डॉ. संजय भैसे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमासाठी प्रा.एल. जी.कांबळे,प्रा.एस. ए.कोळी,प्रा. डि.एच. तांदळे,प्रा. डॉ.बी.एस भालेराव, प्रा डॉ एस.एन. हडोलतीकर,प्रा शिवाजी पाटील, गजानन चौधरी,जनार्दन देवरे प्रदीप वाघ संदीप केदार,अजय देशमुख भूषण मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसचालन प्रा.रचना गजभिये यांनी व आभार प्रदर्शन व प्रा.देवेंद्र मस्की यांनी मानले . कार्यक्रमाचे आयोजन जयंती उत्सव समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमा साठी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.